Fri, Sep 20, 2019 05:34होमपेज › Kolhapur › राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शाहू मानेला तीन पदके

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शाहू मानेला तीन पदके

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 1:50AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापूरचा युवा नेमबाजपटू शाहू माने याने आपली यशस्वी घोडदौड अखंड सुरू ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर त्याने राष्ट्रीय स्पर्धेतही पदकांची लयलूट केली.  त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या  61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या शाहू माने याने तीन पदकांची कमाई केली. 10 मीटर एअर रायफल प्रकारात विविध गटांत दोन सुवर्णांसह एका कांस्य पदकाचा यात समावेश आहे. 

राष्ट्रीय स्पर्धेत शाहू माने याने मिश्र दुहेरी वरिष्ठ गटात पूजा घाटकर हिच्या सोबत कांस्यपदकाची कमाई केली. तर कनिष्ठ गटात प्राची गडकरीसह सुवर्णपदक पटकाविले. युवा मिश्र दुहेरीत नुपूर पटेलसोबत सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या खात्यात दोन सुवर्ण, एक कांस्यपदक मिळवून देण्यात शाहूने मोलाचा वाटा उचलला आहे. स्पर्धेत शाहूचे इतर इव्हेंट शिल्लक असून त्यात आणखी पदकांची अपेक्षा कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींना आहे. तो ‘वेध’ अ‍ॅकॅडमीचा खेळाडू असून आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे. 
 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex