Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Kolhapur › गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची राष्ट्राला गरज : डॉ. यादव

गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची राष्ट्राला गरज : डॉ. यादव

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 12 2018 11:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

भविष्यामध्ये गुणवत्तापूर्ण वैज्ञानिक प्रगतीचा वेग हा खूप असल्यामुळे उद्योगधंदे, प्रशासन, शेती, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये संशोधनाची गरज आहे. या द‍ृष्टीकोनातून भारताला विश्‍वसत्ता बनविण्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज असल्याचे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि, मुंबईचे कुलगुरू  डॉ.जी. डी. यादव यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात विज्ञान संकुलाच्या वतीने  आयोजित साय स्टार या राज्यस्तरीय विज्ञान  स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विश्‍वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर, कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी, शैक्षणिक अधिष्ठाता  डॉ. एम. टी. तेलसंग, विज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. सावंत, डॉ. संतोष माने व  प्रा. एस. एस. सलगरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक  समन्वयक व गणित   विभाग प्रमुख  प्रा. एस. एस. सलगरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख विज्ञान संकुलाचे अधिष्ठाता डॉ. ए. डी. सावंत यांनी करून दिली. संदीप व मनाली यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. सरिता पाटील यांनी केले.