Wed, Nov 21, 2018 09:15होमपेज › Kolhapur › चंबुखडीतील रिक्षाचालकाची आत्महत्या

चंबुखडीतील रिक्षाचालकाची आत्महत्या

Published On: Jan 22 2018 1:53AM | Last Updated: Jan 22 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चंबुखडी (शिंगणापूर) येथील रिक्षाचालक बाळकृष्ण रघुनाथ निकम (वय 52) यांनी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. बाळकृष्ण निकम चंबुखडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात राहण्यास आहेत. शनिवारी रात्री घरातील खोलीत त्यांनी फॅनला दोरीने गळफास लावून घेतला. ही घटना नऊच्या सुमारास कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यांनी बेशुद्धावस्थेत निकम यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निकम यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.