Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Kolhapur › घरबसल्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारी नोंदवा

घरबसल्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारी नोंदवा

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:06AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातंर्गत नागरिकांना आपल्या स्वच्छता व कचरा उठावासंबंधीच्या तक्रारींची तातडीने निर्गत होण्यासाठी महापालिकेकडे तक्रारी नोंदविण्यासाठी शासनाकडून स्वच्छता अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप सर्व अँड्रॉईड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या आपल्या राहत्या परिसरातील कचरा उठाव तथा साफसफाईसंबंधी मोबाईलद्वारे महापालिककेस कळविणे शक्य होणार आहे.

शहरातील सर्व महाविद्यालये, कार्यालये, खासगी संस्थांची कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, विविध भागांमध्ये आयोजित केलेली प्रदर्शने व प्रत्यक्ष नागरिकांच्या घरात जाऊन मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत  संपर्क साधण्यात येत आहे. आजअखेर एकूण 7509 इतक्या नागरिकांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाउनलोड करून कार्यान्वित करून देण्यात आलेली आहेत. अ‍ॅपद्वारे तक्रारींची आरोग्य विभागाकडून 48 तासांच्या आत निर्गत होण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत, असे महापालिकेने पत्रकात म्हटले  आहे.