होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांनी केली मनसोक्त खरेदी

कोल्हापूरकरांनी केली मनसोक्त खरेदी

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ. एम. तर्फे आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. खरेदीसोबत विविध ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दिवसभर गर्दी होती. त्यामुळे रविवार हा खर्‍या अर्थाने खरेदीचा ‘सुपर संडे’ ठरला. खरेदीसोबत चमचमीत पदार्थांचा  आस्वाद घेत कोल्हापूरकरांनी रविवारची सुट्टी यादगार बनवली. आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला आहे. 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला आहे. फेस्टिव्हलसाठी रॉनिक वॉटर हीटर सिस्टीम व पितांबरी रुचियाना सहप्रायोजक आहेत.

रविवारी सर्वच शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने सकाळपासूनच सहकुटुंंब लोक फेस्टिव्हलला भेट देत होते. सकाळी दहा वाजताच प्रदर्शन हाऊसफुल्ल झाले. ख्रिसमस सणाचा उत्साह आणि रविवारची सुट्टी, अशी दुहेरी संधी साधत कोल्हापूरकरांनी ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’मध्ये खरेदीचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. व्यावसायिक स्टॉलवर ऑफर्सची बरसात करण्यात आली आहे. यामध्ये रॉनिक स्मार्ट आटा चक्की खरेदीवर 2 हजारांची, तर रॉनिक वॉटर हीटर सिस्टीम खरेदीवर 1 हजार रुपयांची सूट आहे. मिल्सन घरगुती तेलाचा घाणा सिस्टीमवर 6 हजारांची सूट आहे. क्विक हील सिक्युरिटीकडून 6 महिन्यांची अँड्रॉईड सिक्युरिटी मोफत आणि फ्री लॅपटॉप चेकिंग करून मिळणार आहे. उषा इंटरनॅशनलच्या स्टॉलवर ऑटोमेटिक शिलाई मशिनवर 10 टक्के डिस्काऊंट आहे.

सिक्स पॅक केअर मशिनवर 2 हजार रुपयांंचा डिस्काऊंट दिला आहे. गो इझीच्या स्टॉलवर हँगर सिस्टीमवर 10 ते 15 टक्के सूट आहे. गिट्स फूडच्या स्टॉलवर गुलाब जामुन, इडली, डोसा, ढोकळा पॅकेटवर 10 ते 15 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. भारत गॅसच्या स्टॉलवर नवीन गॅस कनेक्शन त्वरित मिळणार आहे. तसेच गॅस शेगडी खरेदीवर 30 टक्के डिस्काऊंट आहे. पितांबरी होमकेअर डिव्हिजनच्या स्टॉलवर सेंद्रिय गूळ खरेदीवर 40 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. सुजल अ‍ॅक्वा स्टॉलवर 17 हजार 500 रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त 10 हजार 500 रुपयांमध्ये मिळणार आहे. स्पेस सेव्ह इंटिरियरच्या स्टॉलवर कुंडी व कपडे स्टँड खरेदीवर 10 टक्के डिस्काऊंट व फ्री होम डीलिव्हरी आहे. सुदर्शन सोलरच्या उत्पादनावर 15 टक्के डिस्काऊंट आहे. सुहाना मसालेवर  10 ते 50 टक्के डिस्काऊंट दिला आहेत. स्मार्ट किड्स अबॅकस लर्निंग प्रा. लि. च्या स्टॉलवर अ‍ॅडमिशनवर 10 ते 30 टक्के डिस्काऊंट असेल. फोटॉन एनर्जी सिस्टीम्स लिमिटेडच्या स्टॉलवर स्पॉट बुकिंगवर सोलर  टॉर्च मोफत मिळणारआहे.

 रिलायन्स ज्वेल्सच्या स्टॉलवर सोन्याच्या मजुरीवर 70 टक्क्यांपर्यंत, तर डायमंड ज्वेलरीच्या मजुरीवर 100 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय इतर उत्पादनांवरही काहींना काही ऑफर्स असणार आहेत. भरगच्च खरेदीनंतर लोकांनी कोकणी फिश 65, फिश टिक्की, टर्किश चिकन, हैद्राबादी व लखनवी बिर्याणी, राजस्थानी दाल बाटी, स्मोक बिस्कीटे, पॉपकॉन ग्रिल, ग्रीन तवा सुरमई, कोळंबी फ्राय, व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज, हॉट डॉग, बार्बेक्यू चिकन आदी पदार्थांचा आस्वाद घेतला. दरम्यान, फेस्टिव्हलमध्ये अंकुर क्लबतर्फे बालचमूसाठी फॅशन शो स्पर्धा आणि स्पॉट गेम्स घेण्यात आल्या. विजेत्या मुलांना आकर्षक गिफ्ट देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.