Wed, Apr 24, 2019 11:47होमपेज › Kolhapur › खासगी सावकारी; जोडप्यावर गुन्हा

खासगी सावकारी; जोडप्यावर गुन्हा

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 06 2017 1:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

हॉटेल व्यवसायासाठी घेतलेल्या 2 लाख 10 हजारांच्या रकमेपोटी तब्बल तेरा लाखांची वसुली करणार्‍या सावकारासह त्याच्या पत्नीवर करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विजय अनिल शिंदे व रजनी विजय शिंदे (दोघे रा. सुबराव गवळी तालीमनजीक, मंगळवार पेठ) अशी संशयितांची नावे आहेत.

फिर्यादी नीता शामराव गायकवाड (वय 34, रा. सानेगुरुजी वसाहत) यांनी कळंबा तलावनजीक हॉटेल सुरू केले होते. हॉटेलकरिता त्यांनी विजय शिंदेकडून 2 लाख 10 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. रकमेच्या व्याजापोटी दररोज 3,600 रुपये याप्रमाणे शिंदेने वसुली केली. एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 12 लाख 96 हजार रुपये वसूल करूनही शिंदेने 15 लाखांचा तगादा लावला होता. व्याजाच्या वसुलीसाठी शिंदे याने हॉटेलमध्ये जाऊन धमकावण्याचा प्रकार केल्याचेही फिर्यादी गायकवाड यांनी पोलिसांना सांगितले. काही दिवसांपूर्वी शिंदे याने हॉटेलमधील कामगारांना मारहाण केल्याने हॉटेल बंद होते. अखेर गायकवाड यांनी मंगळवारी करवीर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.