होमपेज › Kolhapur › अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकणार

अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकणार

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:16PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाने जिल्ह्यातील 34 प्राथमिक शाळा बंद केल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांना देण्यात आले. राज्य सरकारने कॉर्पोेरेट कंपन्यांना शाळा उघडण्याचा व गरिबांच्या 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने मूठभर उद्योगपतींना याचा नफा होणार आहे.

जिल्ह्यातील कमी पटाच्या 34 शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ येईल. या शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही. शाळांमध्ये अपुरे शिक्षक आहेत, याचा विचार करून 650 शिक्षक, शिक्षकेतर पदे भरावीत. सर्व अशैक्षणिक निर्णय मागे घ्यावेत; अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दलितमित्र व्यंकप्पा भोसले, धर्माजी सायनेकर, संभाजी जगदाळे, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, राजाराम वरुटे, भरत रसाळे, प्रा. जयंत आसगावकर  उपस्थित होते.