Sun, Jul 05, 2020 21:05होमपेज › Kolhapur › हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर

हुल्लडबाजांवर पोलिसांची नजर

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 19 2017 1:19AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

केएसए फुटबॉल लिगने मंगळवारपासून फुटबॉल हंगामाला सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केएसए पदाधिकारी आणि पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली. पोलिस प्रशासनही सज्ज झाले असून सामन्यांवेळी हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना केल्या. दुपारी 2 वाजता दिलबहार तालीम ब विरुद जुना बुधवार तालीम या संघामध्ये पहिल्या सामन्याचा किक ऑफ होईल. 

वरीष्ठ गट फुटबॉल लिगने हंगामाला सुरुवात होत असून शहरातील सर्वच संघांत उत्सुकता आहे. पारंपारीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार्‍या सामन्यांवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलिस घेत आहेत. सोमवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी केएसए पदाधिकार्‍यांसोबत  बैठक घेतली. या बैठकीत शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी महत्त्वपूर्ण सुचना केल्या. 

मैदानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासोबतच सामान्य फुटबॉलप्रेमींना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना करण्यात आली. फुटबॉल सामन्यांनंतर मैदानाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.