Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Kolhapur › पासपोर्ट मुळे खाकी चा देशात झेंडा

पासपोर्ट मुळे खाकी’चा देशात झेंडा

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:22PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : दिलीप भिसे

नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी, यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या प्रयत्नाला चांगले फळ आले.  वर्षात 26 हजार 477 पासपोर्ट वितरित करून त्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी बजाविली आहे. ‘पासपोर्ट’ म्हणजे अत्यंत गुंतागुंत आणि नाना तर्‍हेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव..  नसती कटकटच... त्यात स्वत:ची ओळख पटवून देण्यासाठी करावी लागणारी मनधरणी... त्यामुळे पासपोर्टचा हव्यास कशाला, अशीच काहीशी निराशाजनक भावना निर्माण होत असे.

केंद्र सरकारने पासपोर्ट सेवा सुलभ करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाला सुलभ निर्गतीच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वर्षभरात वर्षात प्रशासनाने प्रभावी कामगिरी करून इतिहास घडविला. पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवासाठी यंत्रणेला झपाटून कामाला लागले. जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सरासरी सात ते आठ हजारांवर पासपोर्टचे वितरण होत असे.

सरत्या वर्षात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीच पासपार्टबाबत स्वत:च पुढाकार घेतला. 1 जानेवारी ते 25 डिसेंबर 2017 काळात जिल्ह्यातून 27 हजार 35 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 26 हजार 477 पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. प्रलंबित 558 प्रस्ताव डिसेंबरअखेर निकालात काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  जानेवारी-एप्रिल 2017 या काळात 5 हजार 951, तर मे ते डिसेंबर 2017 काळात 21 हजार 830 प्रस्ताव निर्गत करण्यात आले आहेत.2016 मध्ये हे प्रमाण 18 हजार 724, तर 2015 मध्ये 20 हजार 198 व 2014 मध्ये 16 हजार 761 असे प्रमाण होते. यंदा त्यात साडेआठ हजार निर्गत  झालेल्या प्रस्तावांची वाढ झाल्याचे दिसून येते.

दरमहा अडीच हजारावर प्रस्ताव  सरत्या वर्षात प्राप्त व कंसात निर्गत पासपोर्टप्रकरणे : जानेवारी 1533 (1533), फेब्रुवारी 1586 (1586), मार्च 1660 ( 1660), एप्रिल 1172 (1172),मे 2077 (2077),जून 2746 (1940),जुलै 3241 (4250), ऑगष्ट 3188 (3536), सप्टेंबर 2900 (2799), ऑक्टोंबर 2143 (2586), नोव्हेंबर 2743 (2113), डिसेंबर  2046 (2529)