Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Kolhapur › सावकारीसह फसवणुकीबाबत तिघांवर गुन्हा

सावकारीसह फसवणुकीबाबत तिघांवर गुन्हा

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सावकारीसह फसवणुकीप्रकरणी तिघांविरोधात राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश वसंतराव पाटील (रा. राम गल्‍ली, मंगळवार पेठ), प्रवीण ईश्‍वर मोहिते (रा. देवणे कॉलनी, साने गुरुजी वसाहत), महेश संभाजीराव पाटील (रा. संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत प्राची धीरज साखळकर (वय 30, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली.  फिर्यादी प्राची यांचे पती धीरज साखळकर बांधकाम व्यावसायिक आहेत. देवकर पाणंद येथील बांधकामाच्या ठिकाणी प्रवीण मोहिते यांना फ्लॅट खरेदी करावयाचा होता. या फ्लॅटचा व्यवहार 32 लाख 50 हजार रुपयांत ठरला होता. यासाठी प्रवीण मोहितेंचे कर्जप्रकरण बँकेने नामंजूर केल्याने त्यांनी मित्र महेश पाटील याच्या पत्नीच्या नावाने घेतला.

यासाठी फायनान्स कंपनीकडून मिळालेला 18 लाखांचा धनादेश 20 जानेवारी 2015 रोजी धीरज साखळकर यांच्या नावे बँकेत भरण्यात आला. याच बँकेत पिग्मी एजंट असणार्‍या महेश पाटीलने साखळकर यांच्या खात्यातील 18 लाखांची रक्‍कम अन्य खात्यावर वळवून त्यांची फसवणूक केली. ही रक्‍कम न मिळाल्याने साखळकर यांनी बँकेकडे तक्रारही केली आहे.  दरम्यान, बांधकाम व्यवसायात अडचणीत आल्याने साखळकर यांनी योगेश पाटील यांच्याकडून 25 लाख रुपये उसणे घेतले. या रकमेला तारण म्हणून दोन फ्लॅट ठेवण्यात आले होते. घेतलेल्या रकमेपैकी 15 लाख 60 हजार रुपये साखळकर यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे योगेश पाटील याला चुकते केले. असे असतानाही योगेश पाटील याने 37 लाख 50 हजार रुपये द्यावे या मागणीसाठी शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद दिली.