होमपेज › Kolhapur › नारायण राणेंची कोल्हापुरात जाहीर सभा

नारायण राणेंची कोल्हापुरात जाहीर सभा

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 2:10AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची शुक्रवारी (दि. 8) येथे दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणार्‍या या सभेची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. काँग्रेसला रामराम करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणे प्रथमच कोल्हापुरात येत असून, त्यांची जाहीर सभा होत आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता राणेंचे कोल्हापुरात आगमन होणार आहे.

अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत शासकीय विश्रामधामवर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता त्यांची जाहीर सभा होईल. दरम्यान, राणे यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी नितेश राणे गुरुवारीच कोल्हापुरात दाखल होत आहेत. सायंकाळी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ते शुक्रवारच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतील.