Thu, Nov 15, 2018 16:33होमपेज › Kolhapur › दूध चोरणारी अल्पवयीन मुले ताब्यात

दूध चोरणारी अल्पवयीन मुले ताब्यात

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 1:58AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

मंगळवार पेठेतील दूध डेअरीच्या बाहेर ठेवलेल्या क्रेटमधील 20 लिटर दूध चोरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ धारदार चाकू आणि एअरगण मिळून आल्याने पोलिसही थक्क झाले. दोघांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नीलेश महादेव पाटील (वय 33, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली. शाहू बँक परिसरात नीलेश पाटील यांची राधाकृष्ण दुग्धालय नावाची डेअरी आहे. डेअरीबाहेर दूध पिशव्या भरलेले क्रेट ठेवण्यात आले होते.

पहाटे साडेचारच्या सुमारास दोघा अज्ञातांनी क्रेटमधील पिशव्या चोरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. नीलेश पाटील यांनी हा सीसीटीव्ही पाहून तत्काळ  चोरट्यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीतील चोरट्यांशी जुळत्या दोघांना दूध पिशव्यांसह काही वेळातच नीलेश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शोधून काढले. दोघांना पकडून राजवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीत या दोघांकडे दोन चाकू आणि एक एअरगण मिळून आली. दोघे चोरीच्या पूर्वतयारीने हत्यारे बाळगून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.