Mon, May 20, 2019 18:50होमपेज › Kolhapur › मेरी ख्रिसमस

मेरी ख्रिसमस

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 12:52AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी.

ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सणासाठी करवीरवासीय सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी  ख्रिस्ती बांधवांची रविवारी गर्दी झाली होती. बच्चे कंपनीसह  प्रत्येकजण  नाताळ अविस्मरणीय करण्यासाठी धडपडत आहे. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण असला तरी समाजातील सर्व घटक एकत्र येत हा सण साजरा करतात.  शाळांना सुट्टी असल्याने मुलांमध्ये  उत्साही वातावरण आहे.
 नाताळनिमित्त न्यू शाहूपुरी, विक्रमनगर, कसबा बावडा, ब्रम्हपुरी आदी चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काही सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला फेस्टिव्हल भरवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे इन अ‍ॅडव्हॉन्स आयोजन केले होते. यामध्ये बालचमुंसह अबालवृद्ध सहभागी झाले. नाताळ उत्सवात सहभागी होण्याकरिता आप्तआप्तेष्टांना आमंत्रण देण्यासाठी घरातील कर्ती मंडळी मग्न आहेत.

बाजारपेठांमध्ये नाताळ सणानिमित्त ख्रिसमस ट्री व  सजावटीच्या साहित्यांची दुकाने सजली आहेत. रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. याशिवाय अनेक मॉलसह मोठ मोेठ्या कपड्यांच्या दुकानात लाल आणि पांढर्‍या रंगाच्या कपड्यांचा सेल सुरू करण्यात आला आहे. ख्रिसमसच्या मुहुर्तावर या रंगाच्या कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.  पर्यटक कोल्हापुरात नाताळ निमित्त परराज्यातील पर्यटक कोल्हापुरात दाखल होण्यास सुरुवात झाली असून पुढचे काही दिवस पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली आहेत. 

पुडिंग आणि ख्रिसमस  डेझर्टची बालचमुंना ट्रीट नाताळ निमित्त ख्रिश्‍चन बांधवांत उत्साहाचे वातावरण आहे. सांताक्लॉलच्या गिफ्टस् आणि पुडिंग व डेझर्टची ट्रीट बालचमुंना मिळाली. ख्रिसमस अधिक चांगला करण्यासाठी फ्रुट केक, ट्रफल, सारेड्रा, कॅरॅमल कस्टर्ड, ड्राय फु्रट चॉकलेट असे अनेकविध स्विटची मेजवाणी लहानग्यासाठी असणार आहे.