Sun, Oct 20, 2019 01:51होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब’ नामकरण

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब’ नामकरण

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:18PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या पदांकरिता  संयुक्‍त पूर्वपरीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मुख्य परीक्षेचा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 स्वतंत्र घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट - ब (अराजपत्रित)’ असे नामकरण आयोगाने केले आहे. 

या परीक्षेची योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेतील ‘विक्रीकर निरीक्षक’ या पदाचे नामकरण आता ‘राज्य कर निरीक्षक,’ असे केले आहे. तसेच लिपिक-टंकलेखक, कर निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट - क या  दांकरिताही संयुक्‍त पूर्वपरीक्षा व पदनिहाय स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोगामार्फत घेतली जाणार आहे.

मुख्य परीक्षेचा पेपर क्र. 1 एकत्रित व पेपर क्र. 2 स्वतंत्र घेण्यात येणार आहे. या परीक्षेचेही आयोगाने नामकरण केले असून, ही परीक्षा आता ‘महाराष्ट्र गट -क सेवा परीक्षा’ या नावाने ओळखली जाणार आहे. या परीक्षेची योजना व अभ्यासक्रम लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. उमेदवारांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन आयोगामार्फत करण्यात  आले आहे.