Sun, Jul 12, 2020 14:05होमपेज › Kolhapur › मोपेडच्या डिकीतील साडेतीन लाखांचे दागिने लंपास

मोपेडच्या डिकीतील साडेतीन लाखांचे दागिने लंपास

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:20AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

आर. के. नगर ते राजेंद्रनगर नाका प्रवासादरम्यान महिलेच्या मोपेडमधील सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले. बँकेच्या लॉकरमधील दागिने घरी नेत असताना ही घटना घडली. याबाबत अनघा प्रशांत नलावडे (वय 45, रा. आर. के. नगर)  यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. अनघा नलावडे मंगळवारी आर. के. नगरातील बँकेत गेल्या. येथील लॉकरमध्ये ठेवलेल्या पाच तोळ्यांच्या चार बांगड्या, पाच तोळ्यांचे तोडे, मंगळसूत्र, नेकलेस त्यांनी काढून घेतले.

सर्व दागिने, पासबुक स्वत:जवळील मोपेडच्या डिकीत ठेवून त्या राजेंद्रनगरात आल्या. दरम्यान, त्यांच्या मोपेडच्या डिकीतील दागिन्यांची बॅग अज्ञाताने चोरून नेल्याचे लक्षात आले.  राजारामपुरी पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी अनघा नलावडे या बँकेत आल्या त्यावेळी कोण कोण कर्मचारी ड्युटीवर होते, किती ग्राहक बँकेत आले होते?,घटनेपूर्वी रेकी करण्यात आली होती का? याची माहिती पोलिस घेत आहेत.