Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › प्रॅक्टिस जुना बुधवार संघांची आगेकूच

प्रॅक्टिस जुना बुधवार संघांची आगेकूच

Published On: Dec 25 2017 1:16AM | Last Updated: Dec 25 2017 1:16AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

साईनाथ स्पोर्टस्वर 1-0 अशा गोलफरकाने मात करून संयुक्त जुना बुधवार संघाने तर संध्यामठ तरुण मंडळावर 2-0 अशा विजयासह प्रॅक्टिस क्लब ‘अ’ संघाने ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. छत्रपती शाहू स्टेडियमवर रविवारी दुपारच्या सत्रात साईनाथ स्पोर्टस् विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला. मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता, यामुळे उत्तरार्धात जुना बुधवारच्या महेश पाटील, हरिष पाटील, मोहंमद शेख, निखील कुलकर्णी, नीलेश सावेकर यांनी आघाडीसाठी वारंवार चढाया केल्या. 75 व्या मिनिटाला शकील पटेलच्या पासवर प्रसाद पाटीलने गोल नोंदवत संघाला विजयी आघाडी 

दिल्याने सामना संयुक्त बुधवार पेठेने 1-0 असा जिंकला. सायंकाळच्या सत्रात प्रॅक्टिस क्लब ‘अ’ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना रंगला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. प्रॅक्टिसकडून अजित पोवार, फॅन्सिस, माणिक पाटील, प्रथमेश यादव, सागर चिले, गणेश दाते यांनी गोलसाठी प्रयत्न केले. संध्यामठकडून अभिजित सुतार, सतीश अहिर, शाहू भोईटे, अजिंक्य गुजर, सौरभ हारुगले यांनी गोलासाठी चढाया केल्या. गोल न झाल्याने मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात प्रॅक्टिसकडून 45 व्या मिनिटाला अजित पोवारने गोल नोंदवत आघाडी मिळविली. त्यांच्याकडून आघाडी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. संध्यामठच्या गोलक्षेत्रात त्यांच्या आशिष पाटीलने चेंडू हाताळल्याने मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर ओलान फॅनियन याने गोल नोंदवत आघाडी 2-0 अशी भक्कम केली. संध्यामठकडून गोलची परतफेड न झाल्याने सामना प्रॅक्टिसने एकतर्फी जिंकला.