Thu, Jun 20, 2019 20:50होमपेज › Kolhapur › ‘छंद प्रीतीचा’ चित्रपटास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘छंद प्रीतीचा’ चित्रपटास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रत्येकवेळी नवनवीन कार्यक्रम आणि मनोरंजनासह सभासदांसाठी भरभरून देणार्‍या दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने सभासदांसाठी मनोरंजनाची पर्वणी दिली जाणार आहे. ‘छंद प्रितीचा’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाचा शो मंगळवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता शाहू चित्रपटगृहात होणार आहे. खास कस्तुरी क्लब सभासदांच्या आग्रहास्तव या चित्रपटाचा दुसरा शो बुधवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी दु. 3.30 वा. शाहू चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी कस्तुरीचे सभासद असूनही ज्या महिलांना तिकिटे मिळाली नाहीत, त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून टॉमेटो एफ.एम. कार्यालयातून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आपली तिकिटे घेऊन जावीत, असे संयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य दिले जाईल. 

कोल्हापूरचेच उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. अनेक वर्षांनंतर असा मराठमोळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरी सर्व कस्तुरी सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपले तिकीट टोमॅटो एफ.एम. कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर. संपर्क क्र. मोबाईल 8805007724, 8805024242. 0231-6625943 येथून वेळेत घेऊन जावे. दरम्यान, कस्तुरी क्लबची सभासद नोंदणी सुरू असून, नोंदणीसाठी महिलांनी लवकरात लवकर संपर्क साधावा व चित्रपटाच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.