Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Kolhapur › सत्यजित चॅम्पियन विजयी

सत्यजित चॅम्पियन विजयी

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:08AM

बुकमार्क करा
शिरोली पुलाची :वार्ताहर 

कोल्हापूर जिल्हा कबड्डी  असोसिएशनच्या मान्यतेने येथील छावा क्रीडा मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘कबड्डी महासंग्राम 2018’ चे आयोजन केले होते. यामध्ये  अंतिंम सामान्यात सत्यजित चॅम्पियनच्या ऋषिकेश गावडेच्या उत्कृष्ट चढायामुळे 15 गुणांनी एकतर्फी सामना जिंकला तर विदीप टायगर्सला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.  पहिला उपांत्य सामना विदीप टायगर्सने मंथन पँथरचा 37 -20 असा 17 गुणांनी पराभव करत अतिंम सामन्यात प्रवेश केला तर दुसरा उंपात्य सामना विजेत्या सत्यजित चॅम्पियनने बाली चॅलेंजर्सचा 34 -23 असा 11 गुणांनी पराभव करून अतिंम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामना विजेता सत्यजित चॅम्पियन व विदीप टायगर्स यांच्यात झाला.मध्यांतर पर्यंत 21 -10 अशी सत्यजितची 11 गुणांची आघाडी होती. ही आघाडी ऋषिकेश गावडेच्या उत्कृष्ट चढायामुळे वाढत जाऊन 31 -16 अशी 15 गुणांनी आघाडी घेत सामन्यात विजयाची मोहर उमटवली.यात विदीप टायगर्सचा अमित पाटील याची झुंज एकाकी पडली.तर तृतीय क्रंमाक बाली चॅलेंजर्स चतुर्थ क्रमांक मंथन पँथर्सला देऊन गौरविण्यात आले.मालिकावीर-ऋषिकेश गावडे (सत्यजित चॅम्पियन) अमित पाटील (विदीप टायगर्स), उत्कृष्ट चढाई -अतुल शिंदे (मंथन पँथर्स), कृष्णात पाटील (सत्यजित चॅम्पियन), नरेश माने या खेळाडूंना एल.इ.डी.टीव्ही संच देऊन गौरविण्यात  आले. 

विजेता सत्यजित चॅम्पियनला 41 हजार व ट्रॉफी,उपविजेता विदीप टायगर्सला 31 हजार व ट्रॉफी, तृतीय संघ बाली चॅलेंजर्स व चतुर्थ संघ मथंन पँथर्स या दोन्ही संघाना प्रत्येकी 11 हजार व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण आ. अमल महाडिक, माजी आ. राजीव आवळे़ वडगाव नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सतिश पाटील़, उपाध्यक्ष राजू पाटील़, अरूण माळी आदींच्या उपस्थितीत  झाले़.स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी बाबुराव गावडे, नामदेव गावडे, कृष्णात पोवार, उत्तम घाडगे आदींनी  परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रावसो मारापुरे यांनी केले.