Mon, Jun 17, 2019 02:09होमपेज › Kolhapur › स्वराज्य संकल्पक जिजाऊंना मानाचा मुजरा 

स्वराज्य संकल्पक जिजाऊंना मानाचा मुजरा 

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:29PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या संकल्पक आणि रयतेला आईची माया देणार्‍या राजमाता जिजाऊ यांची जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली. इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने यानिमित्ताने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराणी ताराराणी सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी  (महसूल) अरविंद लाटकर, भुदरगडचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसीलदार  सविता लष्करे, गणेश शिंदे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे तसेच जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, संचालक सुजय देसाई, समन्वयक संभाजी पाटील उपस्थित होते.  जिजाऊ ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम झाला.

सौ. संयोगीताराजे व सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. नूतन महापौर सौ. स्वाती यवलूजे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी पेठेतील विविध तालीम मंडळांच्या मर्दानी आखाड्यातील मुला-मुलींनी शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी ब्रिगेडच्या कार्याची माहिती दिली. यावेळी अनिता जाधव, नगरसेविका शोभा बोंद्रे, सरिता सासने, सुवर्णा मिठारी, स्मिता हराळे, सुधा सरनाईक, लता जगताप उपस्थित होत्या.  सत्यप्रकाश सेवा मंडळ  शिवाजी पेठेतील सत्यप्रकाश सेवा मंडळाच्या वतीने केएमसी कॉलेज परिसरातील जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अमर तडाखे, अनुप सकटे, राकेश पाटोळे, सिद्धार्थ पाटोळे, अविनाश भोसले आदी उपस्थित होते. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्ष पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुखदेव बुध्याळकर, दिलीप कोथळीकर, शेखर पाटील, संजय देसाई, कुंडलिक कांबळे, मारुती साखरीकर आदी उपस्थित होते. रंकाळा प्रेमींच्या वतीने अभिवादन राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त रंकाळा प्रेमींच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला. सौ. कुसुम शिंदे यांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ. शकुंतला पाटील यांच्या हस्ते निर्भयतेची मशाल प्रज्वलित करण्यात आली.  

मंथन फौंडेशन  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंथन फौंडेशनमार्फत विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये ‘मी एक भारतीय आहे ’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रौनक शहा यांच्या हस्ते बिंदू चौक येथे रॅलीचे उद्घाटन झाले. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी केशरी पांढर्‍या आणि हिरव्या रंगाच्या टोप्या घालत मी एक भारतीय आहे असा संदेश देशभक्तीपर गीतांतून दिला. यावेळी रवींद्र वराळे, प्रा. मधुकर पाटील, अविनाश कांबळे, विनायक सरदेसाई,  गीताताई गुरव उपस्थित होते.

 शिवशक्ती प्रतिष्ठान

शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे  राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त गंगावेश येथील राजमाता हायस्कूलच्या प्रांगणात दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. तसेच जिजाऊंच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करत त्यांना तोफेची सलामी देत मानवंदनाही देण्यात आली.  राजर्षी शाहू हायस्कूल  रिंगरोड येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन प्रशालेची मुख्याध्यापक डी. जी. पाटील व एस. आर. कात्रे यांनी केले. यावेळी बी. आर. पाटील, व्ही. एम. कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन नेहा जाधव, ऋतुजा चौगले यांनी केले. आभार पी. पी. पाटील यांनी मानले.

 नरेंद्र मोदी विचार मंच 

या मंचच्या वतीने जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणातील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बालकल्याण संकुलातील मुलांना धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सुनील सामंत, संगीता तांबे, विद्यालक्ष्मी राजहंस आदी उपस्थित होते.  खादी व ग्रामोद्योग संघ 
खादी व ग्रामोद्योग संघामध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य व्ही.डी. माने व अध्यक्ष सुंदर देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी समता विद्यामंदिरमधील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता व विवेकानंद यांच्या वेषभूषात त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रा. सदाशिव मनगोळे, सौ. सविता देसाई, दादासाहेब जगताप, एस. एस. तुपद आदी उपस्थित होते. 

नाना प्रेमी विचार मंच

नाना प्रेमी विचार मंचच्या वतीने अभिनेते नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी 2018 रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावे जिजाऊ जयंती दिनी ठेव पावतीचे वितरण महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्या हस्ते व आ. राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थित पार पडला. कार्यक्रमास उपमहापौर सुनील पाटील, मंचचे अध्यक्ष अमर जाधव, दिनेश माळकर, नगरसेवक शेखर कुसाळे, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.