Tue, May 21, 2019 00:07होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : 'स्ट्रीट लाइट्स ऑफ फॉर अर्थ अवर'

कोल्हापूर : 'स्ट्रीट लाइट्स ऑफ फॉर अर्थ अवर'

Published On: Mar 24 2018 7:54PM | Last Updated: Mar 24 2018 8:19PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर शहराने 'अर्थ अवर' उपक्रमात सहभाग घेतला असून यासाठी आज (शनिवारी)  शहरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाइट्स एका तासासाठी बंद करण्यात आल्या आहेत. रात्री ८.३० ते ९.३०  शहरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाइट बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील तब्बल २२ हजार स्ट्रीट लाइट्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरण विभागाने दिली. या उपक्रमामुळे महापालिकेच्या वीज बिलात तब्बल दीड लाखांची बचतही होईल. 

कोल्हापूर महानगरपालिका, महावितरण व विविध स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने ‘अर्थ अवर’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाइट्स बंद ठेवण्यात येणार आहेत. ६० वॉटचा एक घरगुती बल्बचा वापर केल्यामुळे ६० ग्रॅम कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जत होते. याचा विचार करुन  कोल्हापूर शहरातील  २२ हजार स्ट्रीट लाइट एका तासाकरिता बंद ठेवून २० हजार युनिट इतकी ऊर्जा बचत होणार आहे. या  उपक्रमामुळे पृथ्वीचे तापमान काही अंशी कमी होण्यास मदत होईल.