Thu, Apr 25, 2019 11:52होमपेज › Kolhapur › उद्योग भरडणार

उद्योग भरडणार

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:27PMकोल्हापूर : वार्ताहर

विजेचे वाढते दर, कुशल कामगारांची कमतरता या सर्वांवर मात करून तारेवरची कसरत करून उद्योग सुरू आहेत. त्यातच शासनाने औद्योगिक दराच्या पाणीपट्टीत वाढ केल्याने  उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. बिगर सिंचन क्षेत्रामधून वर्षाला जिल्ह्यातून 18 ते 22 कोटी रुपये मिळतात. उद्योजकांमधून दरवाढीबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाचे पाणीपट्टीवरील असणारे कर, त्यातच विविध ग्रामपंचायतींचे कर भरताना लघु उद्योजकांची दमछाक होत आहे.

अशा स्थितीत नवीन पाणीपट्टी करवाढ ही मारक ठरत आहे. उद्योगांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी शासन उद्योगांवरच कराचा बोजा वाढवत आहे. अशा स्थितीत मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांना पाठबळ कसे मिळणाार. उद्योजक उदय दुधाणे म्हणाले, आगोदरच पाणीपट्टीचे दर जादा होते. दरवाढ किती असावी, यालाही काही प्रमाण होते. अचानक पाच ते दहा टक्के दरवाढ केल्याने उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.  

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जलसंपदा विभागाने औद्योगिक वापरासाठीच्या पाणीपट्टीत 38 टक्के वाढ केली आहे. कोल्हापूर शहर व लगतच्या उद्योगांना  औद्योगिक कारणासाठी पाणी कमी लागते. ऑटो व फौंड्री उद्योगांना पाण्याची फारशी गरज नसते. कामगारांच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याचा वापर होतो, तरीही आजपर्यंत औद्योगिक दराने बिले दिली जात होती; पण आता नव्याने दरवाढ ही उद्योगांसाठी मारक ठरत  असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष बाबासोा कोंडेकर, अतुल धारवाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.