Tue, Feb 19, 2019 22:35होमपेज › Kolhapur › हद्दवाढप्रकरणी उच्च न्यायालयात २४ जानेवारीला सुनावणी

हद्दवाढप्रकरणी उच्च न्यायालयात २४ जानेवारीला सुनावणी

Published On: Jan 10 2018 2:02AM | Last Updated: Jan 10 2018 2:00AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती. सरकारी पक्षाच्या वकिलांनी वेळ मागितल्याने आता 24 जानेवारीला सुनावणी ठेवली आहे; मात्र न्यायालयाने आदेश देऊनही राज्य शासनाने त्यासंदर्भात निर्णय न घेतल्याने अवमान असल्याचा हा प्रकार आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. 

माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी यापूर्वी रखडलेली हद्दवाढ लवकर करावी, यासाठी काही वर्षांपूर्वी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सहा महिन्यांत शासनाने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते; परंतु न्यायालयाने त्या कालावधीत कोणताही निर्णय घेतला नाही. परिणामी, आडसुळे यांच्या वतीने अ‍ॅड. राहुल वाळवेकर यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.