Mon, Jul 22, 2019 03:44होमपेज › Kolhapur › भाज्यांची रेलचेल, द्राक्षांची आवक 

भाज्यांची रेलचेल, द्राक्षांची आवक 

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 10:30PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भाजी मंडईत सध्या भाज्यांची रेलचेल आहेच; पण द्राक्षांनीही हजेरी लावली आहे. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात बाजारात दिसणारी द्राक्षे आता रस्तोरस्ती दिसू लागली आहेत. द्राक्षे 60 ते 120 रुपये किलोने बाजारात विक्रीस आहेत. भाज्यांची आवकही चांगली असून दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. फळभाज्या 40 ते 60 रुपये किलो तर पालेभाज्या 5 रुपये पेंढीप्रमाणे उपलब्ध आहेत. 
भाजी मंडईतील भाज्यांचे दर असे :

वांगी 40 रु., ढबू 40 रु., टोमॅटो 10  रु., कांदा  40  रु., गवारी 60 रुपये, भेंडी 40 रु., बीन्स 40 रु.,  हिरवी मिरची 40 रु. पापडी शेंग 30 रु., उसावरची शेंग 30 रु., दुधी भोपळा 20 रु., कारली 40 रु., लसूण 30 रु., दोडका 50 रु., वरणा 40 रु.,कोबी 20 रु. , फ्लॉवर  20 रु., पालक 10 रु. 2 पेंढी, मेथी 10 रु. 2 पेंढी, पोकळा 10 रु. 2 पेंढी, कोथींबीर पेंढी  10 रुपयांना 2 पेंढ्या, आलं 40 रु. बटाटा 10 रु., कांदापात 5 ते 8 रु., गाजर 30 रु., शेवगा शेंगा 10 रु. 2 नग, शेपू 10 रु. 2 पेंढ्या प्रमाणे विक्री केल्या जात आहेत. सध्या बाजारात फळांची आवक चांगली आहे. सफरचंद 80 ते 120 रु., चिकू 50 रु., संत्री 50 रु., मोसंबी 55 ते 60 रु., पपई 30 रु. नग, सीताफळ 60 रु., पेरू 80 रु. किलो, केळी 35 ते 50 रु., डाळींब 50 ते 60 रुपये, बोरे 30 रु.

धान्यदर किलोला पुढीलप्रमाणे : तुरडाळ 65 ते 70 रु., मुगडाळ 80 रु., हरभरा डाळ 72, मसुरडाळ 60 रु., मटकीडाळ 100 रु., उडीद डाळ 80 रु., चवळी 80 रु., चवळा 80 रु., ग्रीन वाटाणा 60 रु., काळा वाटाणा 60 रु., पांढरा वाटाणा 42 रु., शेंगदाणे 80 ते 90 रु.,साखर 38 रुपये, साबूदाणा 70 रु., वरी 80 रु., पोहे 40 रु., रवा 28 रु., मैदा 28 रु., सरकी तेल 80 रु., सनफ्लॉवर तेल 90 रु., शेंग तेल 120 रुपये किलो.