होमपेज › Kolhapur › दहा ग्रामंपचायतींसाठी ९२ टक्के मतदान

दहा ग्रामंपचायतींसाठी ९२ टक्के मतदान

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:04AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी चुरशीने 91.62 टक्के मतदान झाले. या दहा ग्रामपंचायतीतील एकूण 18 हजार 600 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. करवीर तालुक्यातील वाशी, निटवडे, केकतवाडी, शिरोली दुमाला, चिंचवाड आणि सांगवडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव, काटे भोगाव आणि वाळवेकरवाडी यासह गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. चंदगड तालुक्यातील कडलगे खुर्द येथील 7 पैकी 2 प्रभागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नव्हते, उर्वरित पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत तर सरपंच पदासाठीही अर्ज न आल्याने हे पद रिक्त आहे.

आज कसबा बावडा येेथे मतमोजणी कुडित्रे : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, केकतवाडी, वाशी, निटवडे, चिंचवाड आणि सांगवडेवाडी या सहा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 91 टक्के मतदान झाले. या सहाही ग्रामपंचायतींची मतमोजणी  बुधवार (दि. 27) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कसबा बावडा येथील बहुउद्देशीय सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संतोष सानप यांनी दिली. या सहा ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान सुरू झाले. शिरोली दुमालामध्ये 90.38 टक्के, वाशीमध्ये 94.24 टक्के, केकतवाडी मध्ये 96.21 टक्के, निटवडेमध्ये 95.85 टक्के चिंचवाड मध्ये 88.59 टक्के तर सांगवडेवाडी येथे 92.34 टक्के मतदारन झाले. एकूण 91.51 टक्के मतदान झाले.

 मतमोजणी बुधवारी (दि. 27) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रमणमळा कसबा बावडा येथे 8 ठेबलांवर 45 कर्मचारी करणार आहेत.  अर्जुनवाडी ग्रामपंचायतीसाठी 84.71 टक्के मतदान नेसरी ः अर्जुनवाडी (ता.गडहिंग्लज)  ग्रा. पं. साठी चुरशीने 84.71 टक्के मतदान झाले तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची नेसरीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गावच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली आहे. बाजार भोगावमध्ये किरकोळ वादावादी  बाजारभोगाव ः पन्हाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या  अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बाजारभोगाव सह काटेभोगाव व वाळवेकरवाडी  ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने  मतदान झाले.

बाजारभोगाव ग्रामपंचायतसाठी किरकोळ शाब्दिक चकमक वगळता  शांततेत  मतदान पार पडले.  येथे  92.93 टक्के इतके  मतदान झाले.     काटेभोगाव ग्रामपंचायतसाठी शांततेत मतदान पार पडले. येथे सत्तारूढ आघाडीकडून चंद्रकांत पाटील व विरोधी गटाकडून रवींद्र पाटील या दोन चुलत भावांत लढत असून या ठिकाणी 94.52 टक्के मतदान झाले. 1261 मतदारांपैकी 1192 जणांनी मतदान केले. यामध्ये प्रभाग एक  423 पैकी 397, प्रभाग दोन 430 पैकी 407, प्रभाग तीन  408 पैकी 388 इतके मतदान झाले. वाळवेकरवाडी  ग्रामपंचायतसाठी 98.70  टक्के मतदान झाले. यामध्ये 693 पैकी 684 झाले. येथील सरपंचपदही खुले असल्याने निवडणुकीत चुरस होती. मतमोजणी  27 डिसेंबर रोजी पन्हाळा येथील नगरपालिकेच्या मयूरबाग येथील हॉलमध्ये  सकाळी दहा वाजता आहे.