Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Kolhapur › गणेश जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

गणेश जयंतीनिमित्त आज कार्यक्रम

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 11:39PMकोल्हापूर : प्रतिनिधी

 रविवार दि. 21 जानेवारी रोजी गणेश जयंती होत आहे.त्यानिमित्त शहरातील सर्व मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंदिरात गणेश जयंतीदिनी गणेश याग व अन्य कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ठिक 12 वाजून 17 मिनीटांनी सर्व मंदिरात गणेश जन्मकाळ सोहळा होणार आहे. अनेक ठिकाणी प्रसाद वाटप पालखी, भजन किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.  न्यू शाहूपुरी येथील श्री सिध्दीविनायक भक्त मंदिरात गणेश जन्मकाळ, पालखी सोहळा होणार आहे. सोमवार दि. 22 रोजी महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. 

येथील सर्वसाक्षी गणेश मंडळामध्ये गणेश जन्मकाळ सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे, रंकाळा येथील जाऊळाचा श्री बाल गणेश भक्त मंडळाच्यावतीने पहाटे अभिषेक, सकाळी 7 वाजता गणेश याग,पूजा, 12 वा. 17 मिनिटांनी जन्मकाळ, सायंकाळी 7 वा. 30 मि. महाआरती व आतषबाजी होणार आहे. अंबाबाई मंदिरातील श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टच्यावतीने मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.  ताराबाई पार्क येथील पितळी गणपती, खडीचा गणपती, उपनगरातील अनेक ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरातही गणेश जयंती होणार आहे. सानेगुरुजी बस स्टॉप येथील मंदिरातही जन्मकाळ होणार आहे.