Sat, Jun 06, 2020 19:06होमपेज › Kolhapur › भेसळखोरी तब्बल एक कोटीची

भेसळखोरी तब्बल एक कोटीची

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः शेखर दुग्गी

गुटखा, तंबाखू, दारू इतकेच नव्हे तर दूध, दुग्धजन्य पदार्थ, चहापूड, हळद अशा प्रत्येक पदार्थात भेसळ होत आहे. बंदी असलेल्या आणि दुसरीकडे जीवनावश्यक असणारे असे कुठलेच पदार्थ भेसळखोरांना वर्ज्य नसल्याचे अन्न व अन्न औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून दिसून येते. ‘अन्न व औषध’ने जिल्ह्यात भेसळ खोरांविरोधात धडक कारवाई करत कोटीचा माल जप्त केला, तर 20 जणांवर फौजदारीही केली आहे.

गुटखा, तंबाखू यांची बेकायदेशीर विक्री आणि दुग्धजन्य, खाद्य पदार्थांमधील भेसळप्रकरणी अन्न औषध प्रशासनाने जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 मध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त केला. प्रतिबंधित पदार्थांंचे बेकायदेशीर उत्पादन, विक्री व साठाप्रकरणी वर्षभरात 20 फौजदारी खटले दाखल करण्यात आले. 

अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात केलेल्या कारवाईत खाद्यतेल, बेसन, मैदा, रवा, मिठाई, डाळी तसेच दुग्धजन्य पदार्थांचे 300 नमुने घेतले. पैकी 60 नमुने खराब व कमी दर्जाचे असल्याचे तपासणीत अघड झाले. 60 नमुन्यांमध्ये 38 प्रकरणांत 4 लाख 69 हजार 500 रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 1 लाख 9 हजार इतके तडजोड शुल्क आकारण्यात आला. 

वर्षभरात 611 संस्थांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 29 संस्थांचे परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. अन्न व्यावसायिकांच्या तपासणीमध्ये आढळलेल्या दोषाच्या आधारे 66 प्रकरणांत 68 हजार दंड करण्यात आला असून 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. सिगाारेट आणि तंबाखू पाकिटांवर 85 टक्के वैधानिक इशारा नसल्याने 8 ते 9 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी 23 लोकांना 5 हजार 900 रुपयांचा दंड केला.

शाळा, कॉलेज परिसरात 100 मीटर अंतरावर गुटखा, पान मसाला यांची विक्री करणार्‍या 15 लोकांवर 17 हजार 800 रुपये दंड केला. सामाजिक उपक्रमांतर्गत प्रशासनाने अंबाबाई मंदिर, नरसोबावाडी, जोतिबा आणि बाळूमामा या देवस्थानमध्ये प्रसाद कसा बनवावा याचे 307 लोकांना प्रशिक्षण दिले. आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल, रेस्टारंटमधील कर्मचार्‍यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कागल आणि जयसिंगपूर येथील पानपट्टीधारकानांही गुटखा, तंबाखू विक्री न करण्याची शपथ दिली आहे.