Tue, Apr 23, 2019 23:47होमपेज › Kolhapur › फायबर टिमक्यांना बच्चेकंपनीकडून ‘डिमांड’

फायबर टिमक्यांना बच्चेकंपनीकडून ‘डिमांड’

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:03PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्या सणामध्ये बालचमुंना विशेष स्थान असते, असे सगळे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. यातीलच एक सण म्हणजे होळी. वाईटाचा विनाश करणार्‍या होळीच्या आधी गल्‍लीबोळांत टिमक्यांचा कडकडाट कानावर पडत राहतो. गुरुवारी साजर्‍या होणार्‍या या सणासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजारात टिमक्यांचा स्टॉल, रंगाचे स्टॉल, पिचकारी यांनी गर्दी ली  आहे. बाजारात टिमकी, हलगी, हलगीच्या प्लेट, ढोल असे अनेक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.  साधारण 60 रुपयांपासून पुढे विविध प्रकारात आणि आकारातही या साहित्याची विक्री होत आहे. शहरातील महाव्दार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, बिंदू चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आदी स्थानिक बाजारपेठांमध्ये टिमक्यांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर दिसते  आहे. 

अलिकडे बाजारात चामड्यांच्या टिमकीचे प्रमाण अत्यल्प आहे.सध्या फायबरच्या टिमक्यांसह चायनीज टिमक्यांची मागणी वाढते आहे. हलक्या आणि वाजवायला सुलभ असणार्‍या या टिमक्यांना बालचमूकडून विशेष पसंती मिळते आहे. विविध रंगांतील आणि आकारातील टिमक्या लक्षवेधी ठरत आहेत. सणाच्या आधीपासूनच शहरातील जुन्या पेठांसह उपनगरे टिमक्यांच्या आवाजांनी दणाणून गेली आहेत. मोटू पतलू, छोटा भीम, डोरेमॉन, दिल दोस्ती दुनियादारी असे कार्टून आणि फिल्मी छायाचित्रे असलेल्या टिमक्या बाजारात उपलब्ध आहेत.  स्थानिक विक्रेत्यांपेक्षा परप्रांतीय विक्रेत्यांची संख्या यावर्षी  अधिक असल्याचे दिसून येते. टिमक्यांच्या खरेदीसाठी बालचमूंची गर्दी होत आहे. 

नेटकर्‍यांकडून संदेशांची गर्दी.....

व्हॉटस् अ‍ॅपवर प्रत्येक सणानिमित्‍त संदेशाची देवाण- घेवाण होत असते. याला होळी सण ही अपवाद नाही. या सणाचे महत्त्व सांगणारे, सणाची नेमकी परंपरा, इतिहास याची माहिती देणार्‍या संदेशांसह उपहासात्मक संदेशांची रेलचेल सोशल मीडियावर सुरू आहे.