Wed, Nov 14, 2018 12:46होमपेज › Kolhapur › महिला कंडक्टरला मारहाण; महिलेसह दोघांवर गुन्हा

महिला कंडक्टरला मारहाण; महिलेसह दोघांवर गुन्हा

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:34AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

लहान मुलाच्या तिकिटाबाबत झालेल्या वादातून महिला कंडक्टरला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. फराह फिरोज झांजी, शब्बीर इसा गोलंदाज (रा.पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मृणाली मानसिंग चौगुले (रा. कुरळप, वाळवा) यांनी फिर्याद दिली.  फिर्यादी मृणाली चौगुले कोल्हापूर आगारात कंडक्टर असून कोल्हापूर - पन्हाळा एस.टी. बसमध्ये तिकिटाबाबत विचारणा करीत होत्या. त्यांनी फराह झांजी यांना मृणाली यांच्यासोबत वाद घातला.

वादातून दोघींत झटापट  झाली.  नखे ओरबडल्याने मृणाली चौगुले जखमी झाल्या. यावेळी शब्बीर गोलंदाज यांनीही शिवीगाळ केली. झटापटीत चौगुले यांच्याजवळील एकूण रकमेतील 674 रुपये पडल्याने त्यांनी रितसर पोलिसांत फिर्याद दिली. यावरून दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.