Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Kolhapur › ब्लॉक...मेक इन इंजिनिअर

ब्लॉक...मेक इन इंजिनिअर

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 9:40PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : विनायक भोसले, विश्‍वस्त, संजय घोडावत विद्यापीठ

सध्या शिक्षण क्षेत्रात झपाट्याने डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जात आहे. अभियांत्रिकी शिक्षण हा त्यातीलच एक भाग आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे यशस्वी अभियंत्यांना तातडीने तांत्रिक क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांची आवश्यकता भासते आहे. अशा वेळी जेव्हा जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे. तेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. 

या  ऐंशी टक्के गृहपाठ आणि वीस टक्के शिक्षण ही शिक्षण पद्धती लोप होत चालली आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षण पद्धतीत झालेला आमूलाग्र बदल. प्राचीन काळापासून शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे माणूस सर्वगुणसंपन्न बनतो. मनुष्याच्या शरीर, मन व बुद्धीचा विकास करणारी व आत्मविश्‍वास निर्माण करणारी शिक्षण प्रणाली विकसित होऊ लागली आहे. सध्या अध्ययन व अध्यापनातील नावीन्यक्रम उपक्रमामुळे व तंत्रामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडून आली  आहे. महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या असंख्य महापुरुषांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच कदाचित एक सुशिक्षित महाराष्ट्र घडला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांहून अधिक शाखांचा उदय झाला आहे. 

सध्या शिक्षण क्षेत्रात झपाट्याने डिजिटल पद्धतीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. अभियांत्रिकी शिक्षण हा त्यातीलच एक भाग आहे. 21 व्या शतकातील सामाजिक आव्हाने व्यापक आहेत. जागतिक लोकसंख्या 9 अब्जांपेक्षा अधिक आहे म्हणून ऊर्जा, अन्न आणि पाणी, गृहनिर्माण, गतिशीलता आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा अधिक तीव्र होतील. शाश्‍वत विकासाच्या मागण्यांसाठी पुन्हा परिभाषित आणि अभिनव अभियांत्रिकी प्रतिभा आणि नेतृत्व आवश्यक आहे. 20 व्या शतकाच्या मध्यावर अभियांत्रिकीचा पाया म्हणून वैज्ञानिक ज्ञानाची स्थापना महत्त्वपूर्ण आहे. 
अभियांत्रिकी क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे  यशस्वी अभियंत्यांना तातडीने तांत्रिक क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांची आवश्यकता भासते आहे.

अशा वेळी जेव्हा जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे, तेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. सध्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात डिजिटल पद्धतीने अध्यापन केले जात आहे. यामध्ये फ्लिप क्लास रूम ब्लेंडेड लर्निंग, डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन प्रेझेंटेशन, डिजिटल व डायनॅमिक अभ्यासक्रम, ऑनलाईन टिचिंग याचा समावेश येतो.  ऑनलाईन फेस टू फेस शिक्षण देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरून डिजीटल शिक्षण पद्धती अवलंबली जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा शिक्षण, सेमिनार आणि इंटरनेट पद्धती वापरून विद्यार्थ्यांना  शिक्षण उपलब्ध करून दिले जाते आहे. पॉवरपॉईट प्रेझेंटेशनद्वारे चित्र आणि आकृतीचा समावेश करून  तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थाना  शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिल्या जातात. काही स्वायत्त अभियांत्रिकी  संस्था दरवर्षी डिजिटल व डायनॅमिक अभ्यासक्रम राबवित आहेत. सध्याचे संशोधन विचारात घेऊन  अभ्यासक्रमामध्ये फेरबदल केले जातात. उद्योग जगताला लागणारे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अभ्यासक्रम राबविले जात आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार आयोजित करुन विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिक्षण संस्थांचे नेहमी प्रयत्न सुरू आहेत. 

ऑनलाईन टिचिंगप्रणालीनुसार देश-विदेशातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा मार्गदर्शन देऊन  विद्यार्थ्यांना  ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. देशातील महत्त्वाची मोठी शहरे आणि मोठे उद्योग समूह या ठिकाणी विद्यार्थ्यांना  प्रत्यक्ष जाऊन शिक्षण अथवा शिक्षणातील अनुभव घेता येत नाहीत. या सुविधा आता सर्व  शिक्षण समूहामध्ये ऑनलाईन स्क्रीन टिचिंगद्वारे दिल्या जातात. तसेच आता शिक्षण संकुलामध्ये विद्यार्थ्यांना  ई-जनरल, ई-पेपर, ई-डाटा, ऑनलाईन पुरविला जातो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण व कौशल्य विकसित करण्यासाठी नवतंत्रज्ञान माहीत होण्यासाठी अनेक नामवंत शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  कंपन्या सोबत सामंजस्य करार केले जातात. संस्था आणि कंपन्यांमार्फत देण्यात येणारे शिक्षण, प्रशिक्षण हे प्रत्यक्ष उद्योग जगतात सुरू असलेल्या कामकाजावर आधारित असते.

सर्व अध्ययन, प्रक्रिया, प्रात्यक्षिक आणि प्रोजेक्ट या पद्धतीने राबविले जाते. त्यामुळे उद्योग जगताला हवा असलेला सर्व कौशल्ये आणि ज्ञानाने परिपूर्ण असलेला पदवीधर सध्या घडविला जात आहे. दहावी-बारावी झाले की पुढे काय करायचे हा फार मोठा प्रश्‍न पालकांसमोर असतो. कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. अशा वेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. अभियांत्रिकीच्या कोणत्या शाखांना चांगला स्कोप आहे, असे सतत विचारले जाते. स्कोप  याचा अर्थ अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर लगेच संबंधित विद्यार्थ्यांला चांगल्या पगाराची नोकरी मिळणे अपेक्षित असते. त्यामुळे अभियांत्रिकीच्या सर्वच शाखा या समान महत्त्वाच्या असतात, असे सांगितले तर पालक आणि विद्यार्थ्यांना पटणे शक्य नाही. सध्याचा पालक हा जागरूक आहे, सर्व बाजूनी विचार करूनच ते शाखा निवडतात.

अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या त्यांच्या शाखांमध्येच नोकरीची वा करिअरची संधी मिळते का, हा मोठा संशोधनाचा आणि काळजीचा विषय बनला आहे. प्लेसमेंटसाठी आलेल्या बहुसंख्य कंपन्या या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान/ तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित असतात. बहुतेक सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्येच प्लेसमेंट मिळते. अभियांत्रिकी शिक्षणातील मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या कायम कोअर म्हणजेच मुख्य शाखा समजल्या जातात. या शाखांमधील विद्यार्थ्यांना नेहमीच उत्तमोत्तम संधी मिळत आल्या आहेत. भविष्यातही मिळतील. सध्या आपल्या देशात ‘मेक इन इंडिया’चे वारे जोरात वाहत आहेत. त्यामुळे निर्मिती क्षेत्राशी निगडित विविध उद्योग विकसित होत आहेत.

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची सर्वात मनोरंजक शाखा आहे. कारण यात संगणक, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषणाचा अभ्यास आहे. वीज निर्मिती, प्रसार आणि वितरण यासंबंधी अनेक गोष्टींचा समावेश या शाखेत येतो. हे अभियंते अणुऊर्जा संयंत्र, हायडेल किंवा औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये काम करू शकतात. रेल्वे, नागरी विमानचलन, वीज मंडळ आणि उपयुक्तता कंपन्या, इलेक्ट्रिकल डिझाईन आणि सल्लागार कंपन्या आणि सर्व प्रकारचे उत्पादन उद्योग यासारख्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. खासगी व सार्वजनिक क्षेत्रात अनेक नव्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी होत आहे. यासाठीही तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासणार आहे.

त्यामुळे इलेक्ट्रिकल शाखेमधील विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती, या क्षेत्राला आलेली गती आणि जगातील प्रगत राष्ट्रांनी यावर लक्ष केंद्रित केले असल्याने इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स या शाखांमधील विद्यार्थी उत्तम प्रकारचं करिअर घडवू शकतात.काही काळापूर्वी  ‘आयटी‘ची एक फार मोटी ‘क्रेझ‘ होती आणि प्रत्येकाला याबाबत एक वेगळेच आकर्षण होते व सध्याही आहे. यामध्ये एखादा सॉफ्टवेअर संबंधित कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेच नोकरी मिळायची. अनेक विद्यार्थ्यांना लहानमोठे कोर्स करून परदेशात जायची संधी पण मिळायची. 

सध्या डिजिटल इंडिया व मेक इन इंडिया हे स्वप्न पाहता आय टी क्षेत्रात सुद्धा लाखो मनुष्यबळ लागणार आहे.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले असून विद्यार्थ्यांनी या बाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.आता वेब डिझायनिग, मल्टिमिडिया, फ्लॅश, डेटाबेस व्यवस्थापन या मध्ये विद्यार्थी कुशल असणे गरजेचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आय टी इंजिनीअर्स ची गरज भासते त्यामुळे आजही या क्षेत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.सध्या इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अनॅलिटिक्स, अ‍ॅण्ड्राइड प्रोग्रॅमिंग, मोबाइल कॉम्प्युटिंग, व्हिडीओ गेमिंग, आयटी सिक्युरिटी या क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. मरिन इंजिनिअरिंग क्षेत्रात सुद्धा चांगले करिअर घडवू शकतो.

जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम इंडियन मेरिटाईम विद्यापीठाने सुरू केले आहेत. यांच्या वतीने पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेची मुंबई, चेन्नई, कांडला पोर्ट, कोलकाता, कोचीन आणि विजाग येथे कॅम्पसेस आहेत. या शाखेला ही सागरी क्षेत्रात नोकरीसाठी वाव आहे. सध्या नव्याने उदयास आलेली शाखा ‘एरोस्पेस इंजिनीअरिंग’ कडे विद्यार्थी वर्ग आकर्षित झाला आहे.

 एरोस्पेस अभियंते विमानचालन, संरक्षण प्रणाली आणि अंतराळ यान मध्ये वापरण्यासाठी नवीन तंत्रज्ञाने विकसित करतात. ते अनेकदा वायुगतियामिक द्रव प्रवाहासारख्या क्षेत्रामध्ये विशेष कार्य करतात. स्ट्रक्चरल डिझाईन मार्गदर्शन, नेव्हिगेशन आणि नियंत्रण, इस्ट्रुमेंटेशन आणि कम्युनिकेशन रोबोटिक्स आणि प्रणोदन आणि दहन इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे. 
या शाखेलाही अभियांत्रिकी क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. वैमानिक अभियंते  प्रामुख्याने विमाने आणि प्रणोदक ंत्रणांना डिझाईन करतात आणि विमान व बांधकाम साहित्याच्या वायुगतियामिक कामगिरीचा अभ्यास करतात. पृथ्वीच्या वातावरणामध्ये ते सीरियस, टेक्नॉलॉजी आणि फ्लाईटच्या प्रॅक्टिकल्समध्ये कार्य करतात. या शाखेतील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी खूप वाव आहे. इलेक्ट्रॉनिक व टेलीकम्युनिकेशन इंजिनीअर्स  प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन संस्था, दूरसंचार व आयटी उद्योग, आरोग्य सेवा उपकरणे उत्पादन, मोबाईल संचार (2 जी, 3 जी, 4 जी), इंटरनेट

तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टील, पेट्रोलियम आणि केमिकल उद्योग, निर्देशन नियंत्रण आणि चाचणी, उत्पादन प्रक्रिया यांसारख्या इतर उद्योगांमध्ये नोकरी मिळवू शकतात. केमिकल इंजिनिअरिंग एक व्यापक अभियांत्रिकी क्षेत्र आहे, ज्यामध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा अभ्यास, अभियांत्रिकी विज्ञान, रचना आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी यामध्ये सुरक्षित, कार्यक्षम, पर्यावरण-अनुकूल, टिकाऊ आणि आर्थिक प्रक्रिया आणि उत्पादने कशी डिझाईन करतात हे शिकतात. ते पायलट-स्केल रासायनिक प्रक्रियेचे उपकरणे आणि सिम्युलेटर्स बरोबर थेट अनुभव प्राप्त करतात. या क्षेत्रासाठीसुद्धा केमिकल व फार्मा कंपन्यांमध्ये नोकरीची संधी आहे.

अर्थव्यवस्थेच्या जवळपास प्रत्येक कल्पक क्षेत्रात रासायनिक अभियंत्यांची मागणी आहे. न्यूक्लिअर  इंजिनीअरिंग क्षेत्र एक आव्हानात्मक  असून यामध्ये अणुशक्ती व त्यासंबंधित विविध विषयांचा समावेश आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परमाणू विज्ञान शिकविले जाते व यामध्ये चांगल्या पद्धतीचे करिअर घडवू शकतो.बी.ई. / बी. टेक. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी ही शाखा सर्व संगणक विज्ञान, प्रोग्रामिंग भाषा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग, नेटवर्किंग इत्यादीवर आधारित आहे. ही शाखा  व्यावहारिक आणि उद्योग क्षेत्रात विशिष्ट वापरासाठी उपरोक्त कौशल्य आणि ज्ञानावर केंद्रित आहे.अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी कोर्स, आयटी एज असे विविध अभ्यासक्रम यामध्ये राबविले जातात.

या शाखेतील विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील  रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. पुढील काही वर्षांमध्ये यांत्रिक अभियंत्यांची गरज भासणार आहे. हे इंजिनीअर्स यांत्रिक अनेक प्रकारच्या प्रकल्पांवर काम करू शकतात. परिणामी, त्यांच्या वाढीचा दर त्या उद्योगांद्वारे वेगळा ठरेल. यांत्रिक अभियंते देखील विविध उत्पादन उद्योगांमध्ये उच्चस्तरावर आहेत, विशेषत: ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रात हे अभियंते संकरित आणि इलेक्ट्रिक कारच्या श्रेणी आणि कार्यप्रदर्शनात सुधारणांत महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पालकांनी पाल्यावर कोणताही दबाव न टाकता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास परवानगी द्यावी. पालकांनी आपल्या पाल्याची नैसर्गिक कलचाचणी, आवड , क्षमता विचारात घेऊनच  योग्य क्षेत्र निवडावे. 

डिप्लोमाधारकांना मोठी संधी...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी सहज शक्य आहे व  इंडस्ट्रीला लागणारे मनुष्यबळ हे  डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांमधून जास्त मिळताना दिसून येते. याचे कारणच की पदविका अभ्यासक्रम हा कमी कालावधीचा आहे व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी जॉबकडे वळतात. पदविकेचे शिक्षण कौशल्यावर आधारित असून थेअरीबरोबरच प्रात्यक्षिकांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव या अभ्यासक्रमात असतो. त्यांना स्वयंरोजगार सुरू करता येतो. त्यांना पुढे शिकण्याची इच्छा असल्यास ते डिग्री अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात.