Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू महाराजांमुळे क्रीडा क्षेत्राचा विकास : पालकमंत्री

राजर्षी शाहू महाराजांमुळे क्रीडा क्षेत्राचा विकास : पालकमंत्री

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:20AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

भावी पिढी सक्षम व निर्व्यसनी राहावी या उद्देशाने लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरातील विविध क्रीडा प्रकारांना  भक्कम पाठबळ दिले. यामुळेच आज क्रीडा क्षेत्राचा विकास झाला असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणारे खेळाडू नावारूपाला येत आहेत. त्यांच्या  कार्याचा वारसा जपत खेळाडूंच्या करिअरसाठी सर्वोतोपरी कार्य करणार्‍या विविध योजना राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. वैयक्तिक पातळीवर खेळाडूंसाठी आपण  स्वतंत्र बजेट  केले असून या माध्यमातून खेळाडूंना  सर्वोतोपरी सहकार्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा-ग्रामीण विभागातर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘युवा सुशासन महोत्सवा’ अंतर्गत रविवारी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. केंद्र व राज्य शासनातर्फे नव्या क्रीडा धोरणात खेळाडूंच्या कल्याणासाठी विविध योजना जाहीर केल्या असून याचा लाभ अनेक खेळाडूंनी घेतला आहे. नव्या खेळाडूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. ताराबाई पार्क येथील सर विश्‍वेश्‍वरैया हॉल येथे झालेल्या कार्यक्रमास संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, बांधकाम समिती सभापती के. एस. चौगुले, संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अजय चौगुले, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या, चिटणीस सुदर्शन पाटसकर, प्रदेश सदस्य अक्षय मोरे, महेश मोरे, आरती माने आदी उपस्थित होते. संयोजन सरदार खाडे, विनायक परुळेकर, सतीश पंडित, संदीप व्हरांबळे, दिग्विजय पाटील, दयानंद चौगले, अमरसिंह भोसले, महेश पाटील, संग्राम घोरपडे, अशोक चौगले आदींनी केले.