Sun, Sep 23, 2018 06:32होमपेज › Kolhapur › लाच घेताना पोलिसपाटलाला अटक

लाच घेताना पोलिसपाटलाला अटक

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:45PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रहिवास दाखल्याकरिता 420 रुपयांची लाच घेताना निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पोलिसपाटील लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. शिवाजी तुकाराम सुतार (वय 52) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी निगवे दुमाला येथे ही कारवाई झाली.

फिर्यादी दत्तात्रय दादू गुरव (रा. केर्ली) यांची जाखले (ता. पन्हाळा) येथे वडिलार्जित 15 गुंठे जमीन आहे. वडिलांच्या निधनानंतर वारसदार म्हणून नावे लावण्यासाठी त्यांनी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधला. या कामासाठी त्यांना पोलिसपाटलांकडून रहिवास दाखला आवश्यक होता. केर्लीचे पोलिसपाटील निवृत्त झाल्याने तात्पुरता कार्यभार  सुतार याच्याकडे होता. गुरव हे सुतारला भेटले. त्याने दाखल्याकरिता 1 हजाराची मागणी केली. तडजोडीनंतर नावाला 60 रुपयेमाणे 6 वारसदारांच्या नावाकरिता 420 रुपये असे ठरविण्यात आले. त्यानंतर गुरव यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी  संपर्क केला.