Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Kolhapur › नवजात शिशूला सोडून मातेचे पलायन

नवजात शिशूला सोडून मातेचे पलायन

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सतरा दिवसांच्या नवजात शिशूला दवाखान्यात सोडून मातेने पलायन केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. सोनाबाई रोहिदास राठोड (वय 25, रा. राजापूर, रत्नागिरी) असे तिचे नाव आहे. मुलाच्या उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने सोनाबाई राठोड निघून गेल्याची चर्चा या ठिकाणी सुरू होती; पण नेमके कारण समजू शकले नाही. अधिक माहिती अशी, सोनाबाई राठोड ही रत्नागिरीहून सीपीआरमध्ये दाखल झाली होती. 3 जानेवारीला तिने पुरुष अर्भकालश जन्म दिला.

मुलाचे वजन 1 किलो 160 गॅ्रम भरले. प्रकृती नाजूक असल्याने त्याच्यावर बालरोग विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी सोनाबाई राठोड मुलाला सोडून अचानक निघून गेल्या. अ‍ॅडमिट होताना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर येथील कर्मचार्‍यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली. 

मुलावर पूर्णपणे उपचार  करणार : डॉ. एस. एस. सरवदे सोनाबाई राठोड या मुलावरील खर्चाची रक्‍कम जादा होत असल्याने निघून गेल्याची शंका आहे; पण सरकारी दवाखान्यात सर्व उपचार मोफत केले जातात. दवाखान्यातून डीस्चार्ज घेताना त्यांचे बिलही माफ झाले असते; पण अर्धवट माहितीमुळे त्या निघून गेल्या असाव्यात का, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. नवजात शिशूवरची देखभाल सीपीआर प्रशासन घेत असून, त्याच्यावर पूर्णपणे उपचार करण्यात येणार असल्याचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. सरवदे यांनी सांगितले.