Wed, Mar 27, 2019 00:27होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : ‘त्या’ प्रेमी युगुलाची प्रकृती स्थिर

कोल्‍हापूर : ‘त्या’ प्रेमी युगुलाची प्रकृती स्थिर

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:11AM

बुकमार्क करा
कोल्हापूर :  

कुटुंबाकडून प्रेमाला होणार्‍या विरोधातून कसबा बावड्यातील प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोघांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कसबा बावड्यातील आडवी गल्लीतील तरुण आणि याच परिसरातील एका तरुणीने रमणमळा परिसरात शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन केले होते. परिसरातील नागरिकांनी दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. दोघांवरही सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.