Tue, Jun 02, 2020 19:24होमपेज › Kolhapur › परप्रांतीय दाम्पत्याची आत्महत्या

परप्रांतीय दाम्पत्याची आत्महत्या

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

आर. के. नगरमधील साई कॉलनीत भाडेकरू म्हणून राहणार्‍या परप्रांतीय दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. रतन भारतसिंग गौंड (वय 26) व मोनिका ऊर्फ मोनी रतन गौंड (22, मूळ रा. मंडण, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.  रतन गौंड हा फरशी फिटिंगची कामे करत होता. पत्नी मोनिकासह तो कोल्हापुरात आला होता. रतन आणि मोनिका गेले दोन दिवस घराबाहेर पडलेले नसल्याचे घरमालक साठे यांच्या लक्षात आले.

दुर्गंधी सुटल्याने साठे यांना संशय आला. त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला असता रतन गौंडने ओढणीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. शेजारीच मोनिकादेखील मृतावस्थेत आढळून आली. तिने विषारी औषध प्राशन केल्याचा पोलिसांना संशय आहे. aरतनच्या मित्रांकडे मिळालेल्या क्रमांकावरून रतनच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता, नातेवाईकांकडून रतनने प्रेमविवाह केल्याची माहिती मिळाली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.