Fri, Jun 05, 2020 04:49होमपेज › Kolhapur › तुमची आयडिया बदलेल सर्वांचे जीवन

तुमची आयडिया बदलेल सर्वांचे जीवन

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 12:30AMकोल्हापूर : विजय पाटील 

तुम्ही विद्यार्थी असो किंवा प्राध्यापक. शिकलेले असो अथवा अशिक्षित. तुमच्याकडे आयडिया आहे ना. मग डोंट वरी. तुम्ही तत्काळ शिवाजी विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाशी संपर्क साधा. तुमच्या आयडियाचे सोने करण्याची जबाबदारी त्यांची. संशोधनासाठी जगभर दबदबा निर्माण केलेल्या विद्यापीठात शिवाजी युनिव्हर्सिटी ग्रुप फॉर अ‍ॅडव्हान्स रिसर्च (शुगर) गेल्या एक वर्षापासून 
यासाठी यशस्वीपणे काम  करत आहे.

‘शुगर’ म्हणजे?

अनेकांकडे भन्‍नाट कल्पना असतात; पण या कल्पना प्राथमिक म्हणजेच कच्च्या स्वरूपात असतात. त्यामुळे त्या मनातच राहून जातात. अशा कल्पना ‘शुगर’च्या व्यासपीठावर घेऊन आल्यास त्या फ्रेममध्ये आणण्याचे काम प्राध्यापक करत आहेत. यासाठी मार्गदर्शन आणि मदत  मोफत दिले जाते. सर्व विषयांतील तज्ज्ञ यासाठी ‘शुगर’च्या माध्यमातून काम करत आहेत. मागील वर्षापासून पंधरा दिवसांतून एकदा केमिस्ट्री विभागात यासाठी बैठक घेतली जाते. या बैठकीस आयडिया असणार्‍यांना खुला प्रवेश दिला जातो. त्यांच्या आयडियांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्पेशल टीम यानंतर मार्गदर्शन करत राहते.

‘रिसर्च कोलोक्युलम’चा लाभ

‘शुगर’च्या धर्तीवरच ‘रिसर्च  कोलोक्युलम’ हे व्यासपीठही संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षापासून काम करत आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे.

सौरऊर्जेवर काम

सौरऊर्जा व सुपर कपॅसिटी या संशोधनासाठी ‘शुगर’चा चांगला हातभार लागला असल्याचे संबंधित प्राध्यापकांनी सांगितले आहे. 

‘सुटा’तर्फे विविध मागण्यांसाठी विद्यापीठात आंदोलन

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, पूर्णवेळ कुलगुरू असावेत, अभ्यास मंडळावर नि:पक्ष व पारदर्शी पद्धतीने शिक्षकाने नामनिर्देशन व्हावे आदींसह विविध मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) च्या वतीने शिवाजी विद्यापीठासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आले. 
‘आमच्या मागण्या तत्काळ मार्गी लावा,’ ‘शिक्षकांंचे प्रश्‍न सत्वर सोडवा,’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्राध्यापकांच्या प्रश्‍नांबाबत अनेक वेळा कुलगुरू यांच्या भेटीसंदर्भात वेळ मागीतली आहे; परंतु कुलगुरूंकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्‍त कार्यभार असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

त्यांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यामुळे कुलगुरू पूर्णवेळ असावेत, प्रोफेसर पदाचे  स्थाननिश्‍चिती शिबिर विनाविलंब आयोजित करणे, प्राचार्य डॉ. एस. आर. पावसकर यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी, मिरज महाविद्यालयातील गैरकारभाराविरोधात प्रशासक नियुक्‍ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रा. डॉ. आर. एच. पाटील, डॉ. एस. एम. पवार, प्रा. यू. एम. वाघमारे, आर. जी. कोरबू आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित होते.