Thu, Apr 25, 2019 13:31होमपेज › Kolhapur › बोर्डाच्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना

बोर्डाच्या परीक्षा केंद्रांची पुनर्रचना

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:11AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रवीण मस्के

विभागीय शिक्षण मंडळाने बोर्ड परीक्षेसाठी केंद्रांची पुनर्रचना केली असून, दहावी-बारावीसाठी नवीन केंद्र निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. मात्र, यंदा विद्यार्थी संख्येत घट झाली आहे. 
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागीय मंडळाकडून परीक्षा घेण्यासह मूल्यमापनाचे कामकाज केले जाते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेस फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये सुरुवात होणार आहे.

ंबारावीच्या परीक्षेला विभागातून नियमित 1लाख 27 हजार 309 आणि सतरा नंबर अर्ज भरून बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2640 आहे. पुनर्रपरीक्षार्थी 132 व श्रेणी सुधारचे 174 विद्यार्थी आहेत. दहावीची विद्यार्थी संख्या नियमित असणारे 1 लाख 48 हजार 456 आहे. सतरा नंबर अर्ज भरणार्‍यांची संख्या 1703 आणि एक विषय घेऊन बसणारे 195 विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची केंद्रांवर होणारी गैरसोय, पेपरच्यावेळी खाली बसणे, बाकडे नसणे अशा अनेक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यावर्षी शाळा-महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर परीक्षा कें द्र देण्याबरोबरच नव्याने परीक्षा कें द्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. गतवर्षी बारावीची 146 केंद्र होती ती आता 154 झाली आहेत. दहावीसाठी मागील वर्षीच्या 351 परीक्षा केंद्रांत वाढ होऊन 354 संख्या झाली आहे. केंद्र देताना बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी,  आदी सुविधांचा विचार करण्यात आला.