Thu, Jan 24, 2019 19:07होमपेज › Kolhapur › ‘प्रभात’ ते ‘सैराट’पर्यंतच्या कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

‘प्रभात’ ते ‘सैराट’पर्यंतच्या कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:27AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

मराठी चित्रपटविश्‍वातील 80 वर्षांचा कालखंड... या कालखंडात घडलेले भावनाप्रधान, तमाशाप्रधान, कौटुंबिक अशा अनेक चित्रपटांचा प्रवास ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून उलघडला. त्या त्या कालखंडातील चित्रपट कसे निर्माण झाले, त्यांना लोकाश्रय कसा मिळत गेला आणि चित्रपट सिल्व्हर ज्युबिली कसे झाले, याची प्रभावीपणे मांडणी करत ‘प्रभात’ ते ‘सैराट’पर्यंतच्या मराठी चित्रपटांतील गाणी कलाविष्काराच्या माध्यमातून सादर करत रसिकांना खिळवून ठेवले.

निमित्त होते भीमा फेस्टिव्हलचे. शाहू खासबाग मैदानात दोन दिवस चाललेल्या भीमा फेस्टिव्हलची रविवारी सांगता झाली. भागीरथी संस्थेच्या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संसदेमध्ये दूध दरवाढीबाबत प्रश्‍न विचारल्याबद्दल ‘गोकुळ’च्या वतीने 11 किलोचा केक कापून खा. धनंजय महाडिक यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी आ. महादेवराव महाडिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास नारायण पाटील, अरुण नरके, अरुण डोंगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.