Sat, Nov 17, 2018 14:38होमपेज › Kolhapur › खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी बैठक

खंडपीठ कृती समितीची शुक्रवारी बैठक

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 19 2017 1:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

खंडपीठ मागणी आणि अवमान याचिकेबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी सहा जिल्ह्यातील वकिलांची बैठक शुक्रवारी कोल्हापुरात बोलाविण्यात आली आहे. मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनात दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. 

खंडपीठ स्थापनेबाबत कोल्हापूरसह  सांगली,  सातारा,  सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापुरातील काही तालुक्यांच्या कृती समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनादरम्यान तत्कालिन न्यायमूर्ती मोहित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. तसेच तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी वकिलांवर दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी सांगितले.