Tue, Jul 23, 2019 06:21होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नेमण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा

अंबाबाई मंदिर पगारी पुजारी नेमण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा

Published On: Jan 10 2018 2:02AM | Last Updated: Jan 10 2018 2:02AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

 श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणे व गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत वेळोवेळी आपल्याकडून आश्‍वासने देण्यात आली होती, पण अद्याप याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. तरी लवकरात लवकर याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशा मागणीसाठी श्री करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. 15 दिवसांत शासनाकडून या प्रकरणावर निर्णय न झाल्यास मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.   

अंबाबाई देवस्थानशी निगडित आमच्या सर्व मागण्यांवर आजअखेर काही निर्णय झाला नाही, अप्रत्यक्षरीत्या  गैरकारभार करणार्‍या पुजार्‍यांना सरकारकडून सहकार्य केले जात असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुजारी हटाव व पागारी पुजारी नेमणे व इतर मागण्यांबाबत 15 दिवसांत महाराष्ट्र शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून मंत्रालयाच्या दारात आई अंबाबाईचा गोंधळ घातला जाईल, असेही कळवण्यात आले आहे. शिष्टमंडळात दिलीप देसाई, अशोक पोवार, अजित सासणे, सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील, किशोर घाटगे, किसन भोसले, महेश कुलकर्णी, संदीप देसाई, दिलीप सावंत, जयदीप शेळके, उदय लाड, सुशांत चव्हाण, अक्षय शेळके, सुवर्णा मिठारी, गीता डाकवे, पूजा पाटील, सारिका मांगले,  स्नेहल कुराडे, संतोष चव्हाण, राजेंद्र पाटील, सचिन खांडेकर आदींची उपस्थिती होती.