होमपेज › Kolhapur › आजही ती काळरात्र काळजात धस्स करते

आजही ती काळरात्र काळजात धस्स करते

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:16PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

तो दिवस आणि ती रात्र आठवली की, आजही काळजात धस्स होते; पण त्या रात्रीने हिंमत आणि धैर्य दिले. त्यामुळे आपण 62 प्रवाशांना घेऊन जखमी अवस्थेत सुरक्षितस्थळी पोहोचलो, असा  त्तथरारक अनुभव कथन करत सलीम गफूर शेख यांनी 10 जुलै 2017 च्या रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासात  घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनुभव कथन केले. शेख म्हणाले, 10 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता खनबल (काश्मीर) येथे समोरून बसवर दशतवाद्यांचा बेछूट गोळीबार सुरू होता. बसचे चाक पंक्चर असल्याने आपण येथे थांबलो होतो. जीवाच्या आकांताने प्रवाशी ओरडत होते. बसचे सर्व दरवाजे बंद करून जीवाची पर्वा न करता दोन कि.मी.चा प्रवास करून बस सुखरूपस्थळी पोहोचवली. 

या हल्ल्यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एका प्रवाशाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या हल्ल्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. गेल्या चार वर्षांपासून आपण अमरनाथ यात्रा करतो; पण असा भ्याड हल्ला कधी झाला नव्हता; पण अनेकांच्या बोलण्यांतून दहशतवादी हल्ल्याबाबत ऐकले होते. दोन कि.मी.च्या प्रवासानंतर अनंतनाग येथे आर्मी सैनिकांजवळ बस घेऊन पोहोचलो. सैनिकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.  जखमींना आर्मीच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये 30 महिला होत्या. त्या जीवाच्या आकांताने ओरड होत्या. ग्रामस्थांनी बसभोवती गर्दी केली; पण सैनिकांनी काही अनर्थ घडू नये म्हणून लाठीचार्ज करून त्यांना पांगवले.

राज्य सरकारकडून उपेक्षा या धाडसाचे कौतुक महाराष्ट्र व गुजरात सरकारने केले. गुजरातने वीरता शौर्य पुरस्कारासाठी घोषणा केली असून अर्थिक मदत देऊ, अशी घोषणा केली आहे.  जम्मू-काश्मीर साईन बोर्डने 2 लाखांची  आर्थिक मदत दिली. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही, असेही शेख यांनी सांगितले.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, विनोद कांबोज, प्रमोद पाटील, आसिफ शेख उपस्थित होते.