Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Kolhapur › रजपूतवाडीजवळ अपघातात 1 ठार; पाच जण जखमी

रजपूतवाडीजवळ अपघातात 1 ठार; पाच जण जखमी

Published On: Jan 10 2018 2:26AM | Last Updated: Jan 10 2018 2:25AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रजपूतवाडी (ता. करवीर) येथे मंगळवारी मध्यरात्री दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. यात ओम्नीचालक नागेश ठोंबरे (रा. खानापूर, जि. बेळगाव) जागीच ठार झाले, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले.  जखमींमध्ये ओम्नीतील दिगंबर सिद्धाप्पा धाडी, नागेंद्र तुकाराम गुरव, नीता दत्तू मावळे  (सर्व. रा. खानापूर, जि. बेळगाव), तर कारमधील अवधूत उमेश पाटील (वय 35) व महेश मोहनराव पाटील (दोघेही रा. मटण मार्केट परिसर, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अवधूत व त्याचा मित्र महेश पाटील हे दोघे जेवण करण्यासाठी पन्हाळ्याकडे गेले होते. जेवण आटोपून ते कोल्हापूरला परतत होते. बेळगावहून ओम्नीतून धाडीसह पाच जण रत्नागिरीला कामासाठी निघाले होते. यावेळी रजपूतवाडीजवळ दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली.