Tue, Jul 16, 2019 11:43होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेची आज अर्थसंकल्पीय सभा

जिल्हा परिषदेची आज अर्थसंकल्पीय सभा

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 21 2018 10:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक गुरुवारी होणार्‍या अर्थसंकल्पीय सभेत सादर होणार आहे. दुपारी 1 वाजता शाहू सभागृहात होणार्‍या या सभेत अर्थ समिती सभापती अंबरिश घाटगे आपला पहिला अर्थसंकल्प सभागृहाला सादर करणार आहेत. गेल्यावर्षी सभापती निवडी झाल्या नसल्याने प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून सीईओ व कॅफोनी सादर केला होता. यावर्षी खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधींचा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. 

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या या अर्थसंकल्पात काय काय दडलंय याविषयी ग्रामीण जनतेत उत्सुकता लागून राहिली आहे. साधारणपणे यावर्षी अर्थसंकल्प 39 कोटींपर्यंत राहणार आहे. कोणकोणत्या नवीन योजना जाहीर होणार याबाबतही मोठी उत्सुकता आहे. गेले वर्षभर निधीची चणचण अनुभवणार्‍या जिल्हा परिषदेच्या या अर्थसंकल्पात काय दडलंय, याचे सर्वांनाच कुतूहल आहे.

अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्यासाठी यावर्षी प्रथम सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व घटकांकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांचा विचार करून निधीच्या उपलब्धततेनुसार त्याचा प्राधान्यक्रम ठरवण्याची कसरत वित्त विभागाने केली आहे. पायाभूत सुविधांसह नावीन्यपूर्ण योजनांवर भर देतानाच जि.प.च्या उत्पन्‍नात वाढ करण्यासाठी कोणकोणते उपक्रम हाती घेतले जातील, अशी अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा व्यक्‍त होत आहेत. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Kolhapur Zilla Parishads, budget meeting, today