Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Kolhapur › ४,२०० विद्यार्थ्यांना ८४ लाखांची मोफत पुस्तके : क्षीरसागर 

४,२०० विद्यार्थ्यांना ८४ लाखांची मोफत पुस्तके : क्षीरसागर 

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:39PMकोल्हापूर : प्रतिनिधी  

कोल्हापूर युवा सेना व श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने शहरातील तब्बल 4,200 गरजू विद्यार्थ्यांना 84 लाखांची मोफत पुस्तके देण्यात आली. 21 महाविद्यालयांतील अकरावी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी 200 विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. यापुढेही गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहात पुस्तक वाटपाचा कार्यक्रम झाला. 

आ. क्षीरसागर म्हणाले, यापुढे तरुणवर्गाला रोजगारासाठी प्रयत्न करणार आहे.शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी 6 ऑक्टोबरला कोल्हापुरात भव्य मेळावा आयोजित करणार आहे. यावेळी डॉ. अमर आडके, विद्यार्थी शुभम पाटील, प्रा. पांडुरंग पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, दिगंबर फराकटे,  राहुल चव्हाण आदींसह इतर उपस्थित होते. 

सीपीआरसाठी 33 लाखांचा निधी 

श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याशी सीपीआरमधील सोयीसुविधांबाबत चर्चा केल्याचे सांगून आ. क्षीरसागर म्हणाले, बांदेकर यांनी तत्काळ सीपीआरसाठी तीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर मंजूर केले आहेत. त्याची किंमत 33 लाख असल्याचेही त्यांनी सांगितले.