Fri, Feb 22, 2019 22:07होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जलसंधारणाच्या कामात 60 टक्के अपहार

कोल्हापूर जलसंधारणाच्या कामात 60 टक्के अपहार

Published On: Feb 28 2018 2:23AM | Last Updated: Feb 28 2018 2:06AMमुंबई  : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर जलसंधारण विभागात 2014 ते 2017 या कालावधीत सुमारे 100 कोटी रुपये खर्चाच्या मृदा व जलसंधारणाच्या कामांमध्ये 94 अधिकारी व कर्मचार्‍यांनी गैरव्यवहार केला आहे. यामध्ये 60 टक्के रकमेचा अपहार झाला असल्याचे लेखी उत्तर जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले आहे. विधान परिषद सदस्य शरद रणपिसे, संजय दत्त, जनार्दन चांदूरकर आदींनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता.

गैरव्यवहाराच्या   तक्रारीवरून कृषी विभागाचे दक्षता पथक व कृषी आयुक्‍तालयामार्फत चौकशी केली असता अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणातील संबंधित सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे यांनी दिली.