Tue, Jun 18, 2019 19:24होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी गूळ,भात,काजू देशभर पोहोचवण्याचे प्रयत्न

कोल्हापुरी गूळ,भात,काजू देशभर पोहोचवण्याचे प्रयत्न

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:19AMकोल्हापूर: प्रतिनिधी

कोल्हापूर गूळ, ऊस, भात, काजू हे उच्च प्रतीचं असून देशभरात हे पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांनी सांगितले. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या कृष्णा राज यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकर्‍यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी देशात 22 हजार ठिकाणे बाजार भरविण्यात येणार आहे, ही ठिकाणे निश्‍चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कृष्णा राज म्हणाल्या, सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्‍न दुप्पट करून शेतकरी सधन बनविण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्या द‍ृष्टीने सर्व लहान-मोठ्या शेतकर्‍यांना शेती विषयक नवनवीन योजनांची माहिती द्या. त्यांच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग अर्थात एकात्मिक शेतीचा द‍ृष्टिकोन विकसित करून त्यातून शेतीला पूरक व्यवसायाशी जोडून शेतकर्‍यांना उद्योजक बनविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सन 2017-18 साठी 40717 मृद नमुने तपासण्याचे उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट 101 टक्के झाले, हे काम अभिनंदनीय आहे. यातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळून शेतकर्‍यांना त्याचा उत्पादन व उत्पन्‍न वाढीसाठी फायदा होईल. 

 खा. धनंजय महाडिक  म्हणाले, जिल्ह्यातील काजू हा जगात उत्तम प्रतीचा काजू आहे. पण, काजू उत्पादक असंघटित असल्याने त्यांना चांगला दर मिळत नाही. काजू फळापासून प्रक्रिया करून एनर्जी ड्रिंक बनविण्याच्या युनिटचा प्रस्ताव केंद्र पातळीवर मान्यतेसाठी आहे. त्यास लवकरात लवकर मान्यता द्यावी. प्रलंबित बांबू नर्सरीच्या प्रस्तावालाही मंजुरी द्यावी. aबैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एम. एस. शिंदे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी महावीर लाटकर आदी उपस्थित होते.