Tue, Mar 19, 2019 16:04होमपेज › Kolhapur › कोल्हापूर रेल्वेस्थानक झाले ‘वाय-फाय’

कोल्हापूर रेल्वेस्थानक झाले ‘वाय-फाय’

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 2:22PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर रेल्वेस्थानकात मंगळवारपासून ‘वाय-फाय’ सुविधा सुरू झाली. यामुळे स्थानकावरील प्रवाशांना मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रारंभी प्रवाशांसाठी असणार्‍या या सुविधेचा नंतर परिसरातील नागरिकांनाही फायदा होणार आहे. देशातील रेल्वेस्थानकांवर ‘वाय-फाय’ सुविधा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. त्यानुसार मार्च 2018 पर्यंत 600 स्थानकांवर ही सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 2019 पर्यंत देशातील 8 हजार 500 रेल्वेस्थानकांवर ही सुविधा देण्यात येणार आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेचे दक्षिणेकडील अखेरचे स्थानक असलेल्या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसवर आजपासून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. कोल्हापूर स्थानकात आठवड्यातून एकदा, दोनवेळा धावणार्‍या गाड्यांसह 36 गाड्यांची ये-जा होत असते. यापैकी दररोज 26 गाड्यांची ये-जा असते. यातून दररोज 30 हजारांवर प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. या सर्वांसाठी ‘वाय-फाय’ सुविधा फायदेशीर ठरणार आहे.