Tue, Nov 20, 2018 03:19होमपेज › Kolhapur › अप्पर पोलिस अधीक्षकपदी काकडे

अप्पर पोलिस अधीक्षकपदी काकडे

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:51AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दीड   महिन्यापासून   रिक्त असलेल्या अप्पर पोलिस उपअधीक्षकपदी तिरुपती काकडे यांची मंगळवारी नियुक्ती झाली.  प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची पदोन्नतीवर कोल्हापूर राज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषणचे पोलिस अधीक्षक, तर गडहिंग्लजच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी श्रीनिवास घाडगे यांच्या नियुक्तीचा आदेश झाला आहे. गृह विभागाने या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नोव्हेंबरमध्ये बदली झाल्याने हे पद रिक्त होते.

डॉ. बारी यांच्यावर येथील अप्पर पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. अप्पर पोलिस अधीक्षक हे. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या विशेष तपासाचे सहायक तपासाधिकारी आहेत. शर्मा यांच्या बदलीनंतर तपास प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. काकडे सध्या नाशिकला पोलिस अकादमीत अप्पर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होते. प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांची कोल्हापूर ‘सीआयडी’चे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गडहिंग्लजच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी घाडगे यांची नियुक्ती झाली आहे.