Thu, Jul 16, 2020 08:06होमपेज › Kolhapur › महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे आज महाकुंकूमार्चन सोहळा

महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे आज महाकुंकूमार्चन सोहळा

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 10:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टची स्थापना होऊन 10 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त रविवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भवानी मंडप परिसरात महाकुंकूमार्चन सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात चार हजार महिला सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी लागणारे सर्व साहित्यामध्ये कुंकू, देवीच्या पादुका, भेटवस्तू, अल्पोपहार व लाडू प्रसाद संस्थेच्या वतीने मोफत दिला जाणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही महिला भाविक सहभागी होणार आहेत. वेदमूर्ती सुहास जोशी व  विशाल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी  होणार आहेत.

या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार असल्याने याठिकाणी आपत्कालीन यंत्रणा, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलचे पथक, रुग्णवाहिका व व्हाईट आर्मीच्या महिला प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी श्री अंबाबाई मूर्तीचे पूजन तसेच छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.