Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Kolhapur › 'शिवाजी महाराज की जय'चा जयघोष

'शिवाजी महाराज की जय'चा जयघोष

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 19 2018 10:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी

 हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवे फेटे आणि ‘शिवाजी महाराज की जय’ चा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेडच्या वतीने सोमवारी शिवजयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी, शाहू महाराज, सरनोबत नुरखान बेग आणि मावळ्यांच्या वेशभुषेत सहभागी लहान मुले मिरवणूकीचे खास आकर्षण ठरले.

 आ. राजेश क्षीरसागर, नगरसेवक तौफिक मुल्लानी, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फिरोजखान उस्ताद, गणी आजरेकर आदींच्या उपस्थितीत शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन हुतात्मा पार्क येथून मिरवणूकीला प्रारंभ झाला. ओपन रिक्षामध्ये शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराराणी, शाहू महाराज यांची वेशभुषा परिधान करुन बसलेले लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी यांची वेशभुषा करुन घोड्यावर स्वार कार्यकर्तेही आकर्षण ठरले.
महिलाही एकसारख्या साड्या परिधान करुन आणि डोक्यावर भगवे फेटे घालून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संपुर्ण मिरवणूक मार्गावर ‘शिवाजी महाराज की जय’ चा अखंड जयघोष करण्यात आला. हुतात्मा पार्क येथून सुरु झालेली मिरवणूक पुढे गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, ठेंबे रोड, बिंदू चौक, शिवाजी रोडमार्गे शिवाजी चौक आली. याठिकाणी रॅलीची सांगता झाली. यावेळी फारुक कुरेशी, एम. के. बागवान, भगवान काटे, साजीदखान उस्ताद, किसन कल्याणकर, नझिर देसाई, रियाज कागदी आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.