Thu, Jul 18, 2019 21:40होमपेज › Kolhapur › शाहू मॅरेथॉनचा थरार २५ फेब्रुवारीला

शाहू मॅरेथॉनचा थरार २५ फेब्रुवारीला

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:24AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

‘समता-साक्षरता व क्रीडाविकास’ हा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा लोकल्याणकारी विचार भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘शाहू मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी क्रीडानगरी कोल्हापुरात या स्पर्धेचा थरार रंगणार  आहे.  राज्यस्तरावर होणार्‍या या मॅरेथॉनचे यंदा 23 वे वर्ष असून, स्पर्धकांना एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘विचार छत्रपती शाहूंचा पुरोगामी महाराष्ट्रात थारा नाही जाती-पातीला’ हे यंदाच्या मॅरेथॉनचे ब्रिद आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या परवानगीने आणि कोल्हापूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असो.च्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि अधिक माहितीसाठी 24 फेब्रुवारीपर्यंत बिनखांबी गणेश मित्र मंडळ, दर्शन दौलत अपार्टमेंट येथे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किसन भोसले व कार्याध्यक्ष  धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत  केले.  यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश संघवी, दत्ताजी कदम, महेश कुलकर्णी, संदीप जाधव, रविराज कारीकर, संतोष स्वामी आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठीचे विविध गट असे... खुला गट पुरुष (21 कि.मी), खुला गट महिला (10 कि.मी), शालेय मुले-मुली : 10 वर्षांखालील (1 कि.मी), 12 वयोगट (2 कि.मी.), 14 वयोगट - 45 व 55 वर्षांवरील पुरुष गट (5 कि.मी.), 17 वयोगट (6.2 कि.मी). दिव्यांगांसाठी : 14 ते 17 वयोगट, 10 वर्षांखालील (1 कि.मी.), 12 वयोगट (2 कि.मी.).

स्पर्धेची वैशिष्ट्ये...

23 वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन  15 गटांतील स्पर्धेसाठी 1 लाख 50 हजारांची बक्षिसे  10, 12, 14 व 17 वयोगटातील स्पर्धकांना मोफत प्रवेश.